"बाबा, आठवण येते असं म्हणणार नाही...", वडिलांच्या आठवणीत तेजस्विनी पंडित भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 18:53 IST2023-11-28T18:53:16+5:302023-11-28T18:53:45+5:30
तेजस्विनी वडिलांच्या आठवणीत भावुक झाली आहे.

"बाबा, आठवण येते असं म्हणणार नाही...", वडिलांच्या आठवणीत तेजस्विनी पंडित भावुक
तेजस्विनी पंडित ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटांत काम करून तेजस्विनीने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. तेजस्विनीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तेजस्विनीची आईदेखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनेकदा तेजस्विनी तिच्या आईबद्दल पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसते. पण, आता तेजस्विनी वडिलांच्या आठवणीत भावुक झाली आहे.
तेजस्विनीचे वडील या जगात नाहीत. त्यांच्या आठवणीत तिने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर केली आहे. तेजस्विनीने इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या वडिलांचे काही फोटो शेअर केले आहेत. "तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजासारखं आयुष्य जगत आहे...बाबा, आठवण येते असं म्हणणार नाही, कारण आठवण यायला आधी विसरावं लागतं!!आणि ते अशक्यच," असं तेजस्विनीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
अनेक मराठी चित्रपटांत काम केलेली तेजस्विनी हिंदी सिनेमातही झळकली. ओम राऊतच्या 'आदिपुरुष' सिनेमात तिने शृपणखाची भूमिका साकारली होती. तेजस्विनीने 'रानबाजार', 'समांतर', 'अनुराधा' या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. अभिनयाबरोबरच तिने नुकतंच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे.