मराठी अभिनेत्रींच्या 'त्या' व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 12:24 PM2018-12-31T12:24:49+5:302018-12-31T12:37:49+5:30

चित्रपट, मालिका, नाटक यांचे प्रमोशन करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी दादा, मी प्रेग्नंट आहे या नाटकाचे देखील सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करण्यात आले होते

Marathi actress 'those' videos on social media talk! | मराठी अभिनेत्रींच्या 'त्या' व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा!

मराठी अभिनेत्रींच्या 'त्या' व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा!

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मराठीमधील अभिनेत्री नथ घालून व्हिडीओज् शेअर करीत आहेतहे नाटकाचे, सिनेमाचे कि मालिकेचे प्रमोशन आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. 

चित्रपट, मालिका, नाटक यांचे प्रमोशन करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी दादा, मी प्रेग्नंट आहे या नाटकाचे देखील सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसाद ओकेने ही फेसबुकवर ऑनलाईन मागवलाय... नव्या वर्षांत येतोय नावाची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. प्रसादनंतर हीच पोस्ट निखिल राऊत, चिन्मय मांडलेकरनेदेखील शेअर केली होती. 'क्यूम क्लीनर' नावाचे नवं नाटक  रसिकांच्या भेटीला येते आहे. त्याचे हे प्रमोशन असल्याचा खुलासा झाला आहे. असाच प्रमोशन फंडा सध्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून  सोशल मीडियावर मराठीमधील अभिनेत्री नथ घालून व्हिडीओज् शेअर करीत आहेत. त्यामुळे हे नाटकाचे, सिनेमाचे कि मालिकेचे प्रमोशन आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. 


आतापर्यंत अमृता खानविलकर, प्रिया बापट, सोनाली कुलकर्णी, प्रियांका बर्वे, दीप्ती देवी, आनंदी जोशी आणि स्पृहाने हे व्हिडीओ शेअर केले आहेत. मराठी अभिमान, १३२ इयर्स अगो आणि कॅमिंग सून असे हॅशटॅग असलेल्या व्हिडीओज् मध्ये या अभिनेत्री मराठमोळ्या नथीचं त्यांच्या आयुष्यातील महत्त्व सांगत आहेत.  यावरून या प्रोजेक्टशी या सगळ्यांचा संबंध असल्याचे नक्कीच लक्षात येत आहे. पण हे प्रोजेक्ट काय आहे हे कळण्यासाठी आपल्याला काही दिवस तरी वाट पाहावी लागणार यात काहीही शंका नाही. 

Web Title: Marathi actress 'those' videos on social media talk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.