मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीनं केला मेकओव्हर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2019 16:13 IST2019-12-02T16:13:13+5:302019-12-02T16:13:56+5:30
ही अभिनेत्री गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे.

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या या अभिनेत्रीनं केला मेकओव्हर, फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कानिटकर-कोठारे मुलगी जिजाच्या जन्मापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. मात्र ती जाहिरातीमध्ये झळकताना दिसली. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच उर्मिलाने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
उर्मिलाने नुकताच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप ग्लॅमरस दिसते आहे. या फोटोत तिला पटकन ओळखता येत नाही आहे.
काही दिवसांपूर्वीदेखील उर्मिलाने फोटोशूट केलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
उर्मिला जीजा सोबतचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपू्र्वी उर्मिला, जिजा व आदिनाथ गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेले होते.
दुनियादारी, काकण, मला आई व्हायचंय यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणा-या उर्मिलाला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी नक्कीच तिचे चाहते आतुर असतील.
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे हे आज मराठी चित्रपटसृष्टीतील एक क्युट कपल मानले जाते. त्यांनी अनवट, दुभंग या चित्रपटांमध्ये देखील एकत्र काम केले आहे. तसेच अनेक समारंभ, पुरस्कार सोहळ्यात त्यांना एकत्र पाहिले जाते.
आदिनाथ आणि उर्मिलाचे अनेक फॅन्स असून त्यांना त्यांची जोडी खूपच आवडते.