Urmila Nimbalkar : - तर आता मी साडीत सेक्सी पोझ पण द्यायची नाही का? उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 14:42 IST2022-08-14T14:35:15+5:302022-08-14T14:42:47+5:30
Urmila Nimbalkar : उर्मिलाचे व्हिडीओ, फोटो तुफान व्हायरल होतातच, पण सध्या तिच्या ‘नारी इन सारी’ फोटोशूटची चर्चा आहे. यावरून काहींना तिला ट्रोलही केलं आहे. या ट्रोलर्सला तिने सणसणीत उत्तर दिलं आहे.

Urmila Nimbalkar : - तर आता मी साडीत सेक्सी पोझ पण द्यायची नाही का? उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि युट्युबर उर्मिला निंबाळकर ( Urmila Nimbalkar) गेल्या काही दिवसांपासून जाम चर्चेत आहे. युट्यूबवर उर्मिला मेकअप अन् स्टाईलचे पाठ शिकवते. उर्मिलाने गेल्या वर्षी मुलाला जन्म दिला. त्यानंतर ती काही दिवस युट्यूबवरून गायब होती. मात्र आता ती पुन्हा युट्यूबवर परतली आहे. इतकंच नाही तर, आता तिचा स्वत:चा युट्युब स्टुडिओही आहे. उर्मिला इन्स्टाग्रामवरही प्रचंड अॅक्टिव्ह आहे. सध्या तिची एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.
उर्मिला आपल्या पोस्ट आणि व्हिडीओमधून मुली आणि स्त्रियांसाठी हेल्थ, मेकअप, फॅशन,मदरहूड अशा विविध विषयांवरील टिप्स देत असते. सोबतच स्वत:चे बोल्ड आणि बिनधास्त फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधत असते. यादरम्यान तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही साडीतील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये उर्मिला इंडो वेस्टर्न अंदाजात दिसून येत आहे. अभिनेत्रीने ऑफ शोल्डर ब्लाउज आणि साडीमध्ये अगदी मादक अशा पोज दिल्या आहेत. पण नेहमीप्रमाणे काही युजर्सने उर्मिलाचे हे फोटो पाहून तिला ट्रोल करायला सुरूवात केली. या पार्श्वभूमीवर उर्मिलाने एक पोस्ट शेअर केली आहे.
उर्मिलाची पोस्ट
आपल्या मनात उगाचच आई झाल्यावर स्त्रीने कधीच सुंदर-मादक दिसायचच नाही,असा समज झालाय. आईला ही कतृत्व गाजवून पैसे कमवावेसे वाटतात, आईलाही आई झाल्यानंतरही सुंदर-सेक्सी दिसावं वाटतं, म्हणूनच वजन कमी करुन, आपल्या पुर्वीच्या ताकदीनं, जोमानं पुन्हा काम करावसं वाटतं. बाळ, घर, करिअर, marital and sexual life heathy व्हावी असं वाटतं आणि सौंदर्यानं भरलेलं तरीही delivery नंतर recover होणाऱ्या शरीराची काळजी तिला घ्यावीशी वाटते.
खरंतर ही काळजी तिच्या घरातील सर्वांनीच घ्यायला हवी! ही काळजी घेताना पुन्हा एकदा आत्मविश्वास कमावणे महत्त्वाचे. आणि इतरांनी तिला या सगळ्या roles मधून जाताना साथ द्यायला हवी! या पोस्टचा उद्देश trollers ना धडा शिकवणं नसून, नविन विचारांना वाट दाखविण्याचा आहे, अशा आशयाची तिची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय.
या पोस्टसोबत उर्मिला तिचे साडीतील अतिशय मादक असे पाच फोटो शेअर केले आहेत. या पाच फोटोना तिने दिलेलं कॅप्शन तुम्ही वाचायलाच हवं. मला बाळ झालं तर आता मी साडीत सेक्सी पोझ पण द्यायची नाही का? असा सवाल तिने या निमित्ताने विचारला आहे.