ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 12:08 PM2018-11-06T12:08:53+5:302018-11-06T12:15:24+5:30

हा फोटो कशासंदर्भातील हे तिने सांगितलं नसलं तरी तो फोटो तिच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा होता हे तिच्या फॅन्सनी लगेच ओळखलं.

This Marathi actress very soon enjoy motherhood, celebrated dohale jevan function | ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

ही मराठी अभिनेत्री लवकरच बनणार आई, नुकताच पार पडला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम

googlenewsNext

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या घरातून ऐकायला मिळत असतील. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे कोंबडी पळाली फेम क्रांती रेडकर. नुकतंच तिच्या घरी एक कार्यक्रम पार पडला. त्याचा फोटो तिने सोशल मीडियावरही शेअर केला. हा फोटो कशासंदर्भातील हे तिने सांगितलं नसलं तरी तो फोटो क्रांतीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचा होता हे तिच्या फॅन्सनी लगेच ओळखलं.

 

या फोटोत तिने नकात नथ, कपाळावर हळद कुंकू आणि डोक्याला फुलांचा गजरा बांधल्याचं दिसत आहे. त्यामुळे अशाप्रकारे साजश्रृंगार हा डोहाळे जेवण कार्यक्रमासाठी केला जात असल्याची खात्री तिच्या फॅन्सना पटलीय. शिवाय क्रांती लवकरच आई बनणार असून त्याबाबतच्या फोटो तिच्या अनेक मित्रांनी शेअर केले. त्यांनीते फोटो नंतर डिलीट केले तरी या नव्या फोटोमुळे क्रांती आई बनणार असल्याचे फॅन्सच्या मनात पक्कं झालं असून त्यांच्यात आनंदाचं वातावरण आहे. 

त्यांनी क्रांतीवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरूवात केलीय. गेल्याच वर्षीच म्हणजे २०१७ साली क्रांती रेडकरने समीर वानखेडे ह्यांच्याशी लग्न केलं. अगदी गुपचूप गुपचूक लग्न करणारी क्रांती रेडकर आता आणखीन एक आनंदाची बातमी देणार असल्याने तिच्या फॅन्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 'जत्रा' सिनेमातील ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिनं 'ऑन ड्युटी 24 तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे'  यांसारख्या सिनेमात अभिनयाची जादू दाखवली. अभिनयासह तिने दिग्दर्शिका आणि निर्माती म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे. तिने 'काकण' या सिनेमाचे दिग्दर्शनही केले होते.


29  मार्च 2017 ला क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकली होती. त्यावेळी लोकमतसह खास बातचितमध्ये तिने सांगितले होते की,  "माझे पती हे देश सेवेत असल्याने त्यांच्यासाठी त्यांची ओळख ही गुलदस्त्यात ठेवणे हे गरजेचे असते आणि त्याचमुळे आम्ही दोघांनी अगदी साधेपणाने लग्न करायचे ठरवले. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यातील वेडेपणा आयुष्यभर राहू देणारा नवरा मला मिळाला पाहिजे असे माझ्या मैत्रिणींना नेहमीच वाटायचे आणि तो तसाच आहे. तो नेहमीच माझ्यातला मी पणा मला जपायला सांगत असतो. तो आणि मी स्वभावाने पूर्णपणे विभिन्न आहोत. तो तणावात असेल तर काहीच क्षणात मी तो तणाव दूर करण्यास सक्षम असते. आम्ही पती-पत्नी होण्याआधी एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत आणि आयुष्यभर राहाणार यात काही शंकाच नाही. मी लग्नानंतरही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून माझे करियर सुरूच ठेवणार असल्याचे तिने म्हटले होेते.

Web Title: This Marathi actress very soon enjoy motherhood, celebrated dohale jevan function

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.