"वाटले नव्हते कधी..." रमेश देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक; सादर केली सुंदर कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:17 PM2024-10-22T13:17:25+5:302024-10-22T13:19:47+5:30

अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकताच सोशल मीडियावर एक भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

marathi cinema actor ajinkya deo emotional in memory of father ramesh deo presented poem share video on social media | "वाटले नव्हते कधी..." रमेश देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक; सादर केली सुंदर कविता

"वाटले नव्हते कधी..." रमेश देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक; सादर केली सुंदर कविता

Ajinkya Deo : अजिंक्य देव (Ajinkya Deo) यांनी नुकताच सोशल मीडियावर एक भावुक करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता वडील रमेश देव यांच्या आठवणीत भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी कलाविश्वातील हँडसम अभिनेता म्हणून आजही अजिंक्य देव (ajinkya deo) यांच्याकडे पाहिलं जातं. जबरदस्त पर्सनालिटीमुळे अजिंक्य देव यांची आजही  तरुणींमध्ये क्रेझ पाहायला मिळते. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत अजिंक्य देव यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. इतकंच नाही तर काही हिंदी सिनेमांमध्येही ते झळकले.उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर त्यांनी मराठीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. अजिंक्य देव जेष्ठ अभिनेते रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांचे सुपुत्र आहेत. सोशल मीडियावर ते कायमच सक्रीय असतात. त्याद्वारे आपल्या भावना ते व्यक्त करताना दिसतात.


नुकताच अजिंक्य देव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर वडील रमेश देव यांच्या आठवणीत त्यांनी मन हेलवणारी कविता सादर केली आहे. दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

अजिंक्य देव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वडिलांच्या आठवणीत भाऊसाहेब पाटणकर यांची कविता म्हणत ते भावुक झाले आहेत.

“वाटले नव्हते कधी काळ आहे यायचा,
संपले हे उद्यान आणि आहे सहारा यायचा,
या वेळीसही रेतीत मी फुलबाग आहे लावली,
इतुकेचही या इथे मी आज फक्त अबोली लावली...!"

"गंधही आहे इथे, आहे अबोली ही जरी,
आहे स्मृतींचा गंध इथे, त्यांना जरी नसला तरी,
रिझविण्या आम्हा इथेही आहेत कोणी सोबती,
सोबती आहेत आसू, गतकाल आहे सोबती...!!"

"आसुसवे या आज मी बागेत माझ्या विहरतो ,
घेऊनिया जलभार जैसा मेघ व्योमी विहरतो
शास्त्रातही जो स्पष्ट इतुका नाही कुठे सांगितला,
अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला...!!!

अशा पद्धतीने कविता सादर करत अजिंक्य देव शेवटी रमेश देव यांच्या आठवणीने गहिवरून गेले आहेत. व्हिडीओच्या सरतेशेवटी 'बाबांच्या मनात कदाचित हेच विचार असतील', असं ते म्हणाले.

Web Title: marathi cinema actor ajinkya deo emotional in memory of father ramesh deo presented poem share video on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.