अशोक शिंदे यांनी का नाकारली 'छावा' चित्रपटाची ऑफर; म्हणाले- "मराठी प्रेक्षकांवर अन्याय केल्यासारखं..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:01 PM2024-11-12T16:01:43+5:302024-11-12T16:08:54+5:30

अभिनेते अशोक शिंदे यांना मिळाली होती 'छावा' चित्रपटाची ऑफर; 'या' कारणामुळे दिला होता नकार.

marathi cinema actor ashok shinde revealed in interview about why he reject chhaava film offer know the reason | अशोक शिंदे यांनी का नाकारली 'छावा' चित्रपटाची ऑफर; म्हणाले- "मराठी प्रेक्षकांवर अन्याय केल्यासारखं..."

अशोक शिंदे यांनी का नाकारली 'छावा' चित्रपटाची ऑफर; म्हणाले- "मराठी प्रेक्षकांवर अन्याय केल्यासारखं..."

Ashok Shinde : मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अभिनेते म्हणजे अशोक शिंदे(Ashok Shinde).आजवर अशोक शिंदे यांनी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 'दामिनी', 'घरकुल', 'सुवासिनीची सत्व परीक्षा', 'दुहेरी', 'छत्रीवाली, 'काकण' यांसारख्या  चित्रपटांमधून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. अलिकडेच अशोक शिंदे झी मराठीवरील 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेमुळे चर्चेत आले होते. काही दिवसापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. नुकतीच अशोक शिंदे यांनी एका मुलाखतीत त्यांनी बहुचर्चित 'छावा' चित्रपटात काम करण्यास नकार का दिला? याबद्दल सांगितलं. 

नुकतीच अशोक शिंदेंनी 'इट्स मज्जा'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी 'छावा' चित्रपट न करण्यामागचं कारण सांगितलं. या मुलाखतीत ते म्हणाले, "लक्ष्मण उतेकर यांचा 'छावा' चित्रपट येतोय. या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांनी मला विचारलं. तर त्यांच्या तारखा मॅच होत नव्हत्या. तेव्हा माझं झी बरोबर कॅन्ट्रॅक्ट होतं. त्यावेळी त्यांनी मला रोलबद्दल सांगितलं. तो रोल एक दिवसाचा होता".

पुढे ते म्हणाले, "त्यावेळी पोस्टवर माझा फोटो देखील लावला होता. अनिल कपूर, विकी कौशल तसेच रश्मिका मंदाना यांच्यासोबत माझा 'हरहर महादेव' चित्रपटातील फुलाजी प्रभूजी यांचा फोटो लावण्यात आला. चित्रपटात अनिल कपूर औरंगजेब करणार होते तर विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत होता. तर मी त्यांना म्हटलं की लक्ष्मणराव हा चित्रपट मी करावा? त्यावर ते म्हणाले की माझी इच्छा आहे म्हणून कर. मग मी सांगितलं, माझं बॅगेज आहे. माझी एक पत्रकार मंडळी तेरा करोड प्रेक्षक आहेत. त्यांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. ती भूमिका सकारात्मक असती तर ठीक होतं, तो रोल खूपच निगेटिव्ह होता. म्हणजे तो व्यक्ती छत्रपती संभाजी महाराजांबद्दल माहिती देतो आणि नंतर राणी सरकार त्याला हत्तीच्या पायदळी देतात. मला हे योग्य वाटलं नाही. हे मला माझ्या मराठी प्रेक्षकांवर अन्याय केल्यासारखं वाटतं. म्हणून मी नकार दिला".

Web Title: marathi cinema actor ashok shinde revealed in interview about why he reject chhaava film offer know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.