"या हसऱ्या अन् समाधानाने भरलेल्या...", 'फसक्लास दाभाडे'ला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावला हेमंत ढोमे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 15:10 IST2025-02-03T15:06:37+5:302025-02-03T15:10:35+5:30
हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते आहे.

"या हसऱ्या अन् समाधानाने भरलेल्या...", 'फसक्लास दाभाडे'ला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून भारावला हेमंत ढोमे
Hemant Dhome: हेमंत ढोमे (Hemant Dhome) दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते आहे. सध्या मराठी मनोरंजन विश्वात या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. 'फसक्लास दाभाडे' बॉक्स ऑफिसवरही फसक्लास कमाई करताना दिसत आहे. खदखदून हसवतानाच डोळ्यांची किनार पाणवणारा हा चित्रपट सिनेरसिकांच्या पसंतीस उतरला आहे. प्रदर्शित होताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हाऊसफूल झाला आहे. याचनिमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने 'फसक्लास दाभाडे'च्या प्रेक्षकवर्गाचे आभार मानले आहेत.
सध्या बॉक्स ऑफिसवर हेमंत ढोमेच्या 'फसक्लास दाभाडे'ची यशस्वी घौडदौड सुरु आहे. हेमंत ढोमे आणि क्षिती जोग यांच्या नव्या सिनेमाला सुद्धा प्रेक्षकांनी आपलंसं केलं आहे. आपल्या सिनेमाला प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून हेमंत ढोमे भारावला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अभिनेत्याने म्हटलंय की, "या हसऱ्या आणि समाधानाने भरलेल्या चेहऱ्यांसाठी तर केला होता सिनेमा! भरभरून प्रेम करणाऱ्या फसक्लास मराठी प्रेक्षकांना घट्ट मिठी...!" अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केल्याची पाहायला मिळतेय.
'फसक्लास दाभाडे' हा सिनेमा २४ जानेवारीला हा कौटुंबिक सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.