"राजकारण आणि धर्म बाजूला ठेऊन...", पहलगाम हल्ल्यानंतर हेमंत ढोमेची विचार करायला लावणारी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:12 IST2025-04-24T12:58:16+5:302025-04-24T13:12:47+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर हेमंत ढोमेची विचार करायला लावणारी पोस्ट, नेमकं काय म्हणाला?

"राजकारण आणि धर्म बाजूला ठेऊन...", पहलगाम हल्ल्यानंतर हेमंत ढोमेची विचार करायला लावणारी पोस्ट
Hemant Dhome: जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. या दशहतवादी हल्ल्याचा निषेध करत अनेक राजकीय कार्यकर्ते तसेच सेलिब्रिटी मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होताना दिसत आहेत. या दुर्दैवी घटनेबद्दल मराठी अभिनेता, दिग्दर्शक हेमंत ढोमेने (Hemant Dhome) एक्सवर पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला हा आपल्या “देशावर”झालेला हल्ला आहे…
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 23, 2025
राजकारण आणि धर्म बाजूला ठेऊन,
आता गरज आहे एकत्र उभं राहण्याची…
मृत नागरिकांच्या, त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांच्या, आपल्या देशाच्या सैन्यदलाच्या, सुरक्षा दलाच्या, गृहमंत्री आणि पंतप्रधान सगळ्यांच्या पाठीशी!!!
त्यांना…
हेमंत ढोमे त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर पहलगाम हल्ल्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, "पहलगाम दहशतवादी हल्ला हा आपल्या “देशावर”झालेला हल्ला आहे… राजकारण आणि धर्म बाजूला ठेऊन, आता गरज आहे एकत्र उभं राहण्याची… मृत नागरिकांच्या, त्यांच्या कुटुंबातील सगळ्यांच्या, आपल्या देशाच्या सैन्यदलाच्या, सुरक्षा दलाच्या, गृहमंत्री आणि पंतप्रधान सगळ्यांच्या पाठीशी! त्यांना त्यांचं काम करूदे… आपण देशहिताचं काम करूया! चिखलफेक थांबवूया! देश आधी, राष्ट्रहित आधी!" अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. त्याची ही पोस्ट विचार करायला लावणारी आहे. बऱ्याच नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट्सच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.