"...अन् मी मुलाच्या कानाखाली पेटवायला पुढे आलो", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणतो-" तेव्हा मलाच साक्षात्कार..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 10:28 AM2024-11-02T10:28:04+5:302024-11-02T10:32:21+5:30

अभिनेता कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक मजेशीर पोस्ट शेअर केली आहे

marathi cinema actor kushal badrike post shared childhood memories on social media netizens react | "...अन् मी मुलाच्या कानाखाली पेटवायला पुढे आलो", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणतो-" तेव्हा मलाच साक्षात्कार..."

"...अन् मी मुलाच्या कानाखाली पेटवायला पुढे आलो", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत, म्हणतो-" तेव्हा मलाच साक्षात्कार..."

Kushal Badrike : कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिकांधून त्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे. कुशल सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. त्यामाध्यमातून अभिनेता त्याच्या प्रोजेक्ट्ससोबतच अनेक मजेशीर गोष्टी शेअर करत असतो. अशातच दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये कुशल बालपणीच्या आठणीत रमल्याचा पाहायला मिळतोय. 


सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने भलमोठं कॅप्शन देत लिहलंय, "वात जशी दिव्याला असते तशी ती फटाक्यांनाही असते , कधी कधी आपली मुलं सुद्धा आपल्याला वात आणतात पण ती वात पेटवता येत नाही. परवा माझ्या मुलाने भुई चक्र पेटवलं आणि आभाळात भिरकवलं, मग त्याच्या कानाखाली पेटवायला मी पुढे झालो तर त्या पेट घेतलेल्या “भुईचक्रातून” मार्व्हल मधल्या डॉ. स्ट्रेंजचं पोर्टल ओपन झालं आणि 'टाईम मार्व्हल' करुन मीच माझ्या बालपणात गेलो. तेंव्हां मी बालपणी लावलेल्या शोधांचा मलाच साक्षात्कार झाला .आभाळात उडणारं रॉकेट रस्त्यावर आडवं लावलं तर जास्त मज्जा येते ह्याचा शोधलावणारा अंबरनाथचा एलन मस्क मीच, फुलबाजाच्या दांड्या वाकड्या करून पेटत्या फुलबाज्या झाडांवर टाकून न्यूटनच्या ग्रॅव्हिटी ला चटके देणारा तो मीच .सार्वजनिक शौचालयात गेलेल्या माणसाला आपला शत्रू समजून त्याच्या खिडकीत सुतळी बॉम्ब फोडणारा शिपाई मीच,श्रीकृष्ण मालिका पाहून शिशुपालाचा वध करायला भुईचक्राचं सुदर्शन चक्र करणारा मीच". 

"तेंव्हा माझे पप्पा आम्हाला असं लांबून फटाके फोडताना का बघायचे काही कळायचं नाही.आता मी तसाच लांब उभा राहतो आणि माझ्या मुलाने फोडलेल्या फटाक्याने कुणालाही इजा होऊ नये हे बघतो .“निसर्ग चक्राला वात नसते पण त्याचे चटके बसतात !” अशी मजेशीर पोस्ट शेअर करत कुशलने बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Web Title: marathi cinema actor kushal badrike post shared childhood memories on social media netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.