२० वर्षांपूर्वी याच दिवशी! श्रेयस तळपदेने शेअर केला लग्नाचा खास फोटो, बायकोसाठी पोस्ट लिहून म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:57 IST2025-01-01T12:52:56+5:302025-01-01T12:57:24+5:30
सहजीवनाची २० वर्षे! लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रेयस तळपदेची पत्नीसाठी खास पोस्ट, म्हणतो...

२० वर्षांपूर्वी याच दिवशी! श्रेयस तळपदेने शेअर केला लग्नाचा खास फोटो, बायकोसाठी पोस्ट लिहून म्हणतो...
Shreyas Talpade : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे (Shreyas Talpade). आपल्या अभिनय कारकिर्दीत अभिनेत्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये त्याने ‘ओम शांति ओम’, ‘गोलमाल सीरीज’, ‘वाह ताज’ आणि ‘इकबाल’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये श्रेयसने काम केलं आहे. मालिका विश्वातही त्याने 'माझी तुझी रेशीमगाठ'मधून दमदार कमबॅक केलं होतं. दरम्यान, सोशल मीडियावरही अभिनेता कमालीचा सक्रीय असतो. त्याद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात तो राहण्याचा प्रयत्न करतो. नुकतीच श्रेयस तळपदेने त्याच्या लग्नाच्या २० व्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पत्नीसोबतचे काही खास क्षणचित्रे शेअर केली आहेत.
अभिनेता श्रेयस तळपदेने त्याच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या बायकोला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयस आणि दीप्ती यांच्या सुखीसंसाराला आता २० वर्षे पूर्ण झाली. ३१ डिसेंबर २००४ मध्ये श्रेयस-दिप्ती लग्नबंधनात अडकले. त्यानिमित्ताने अभिनेत्याने त्यांच्या लग्नाचे अनसीन फोटो पोस्ट केले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "२० वर्षापूर्वीचा आजचा दिवस. हॅप्पी अॅनिव्हर्सरी दीप्स..." असं लक्षवेधी कॅप्शन देत अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. दरम्यान, श्रेयस तळपदेने शेअर केलेल्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत मराठी कलाकार श्रेया बुगडे, संदीप पाठक तसेच जितेंद्र जोशी यांनी या जोडप्याला लग्नाच्या व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
श्रेयस तळपदे मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीत तग धरुन आहे. दोन्हीतही त्याचं वेगळं स्थान आहे. लवकरच तो 'वेलकम टू जंगल' या सिनेमातही दिसणार आहे. यामध्ये अक्षय कुमारसह बॉलिवूडमधील इतर बरीच स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.