मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'या' साउथ सुपरस्टारसोबत करणार स्क्रीन शेअर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 02:21 PM2024-12-10T14:21:20+5:302024-12-10T14:23:49+5:30

उपेंद्र लिमये (Upendra Limye) हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे.

marathi cinema actor upendra limaye entry in telugu film will share the screen with south superstar venkatesh daggubati | मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'या' साउथ सुपरस्टारसोबत करणार स्क्रीन शेअर 

मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेचं तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण; 'या' साउथ सुपरस्टारसोबत करणार स्क्रीन शेअर 

Upendra Limye: उपेंद्र लिमये (Upendra Limye) हे मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव आहे. वेगवेगळ्या मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम करून त्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवली आहे. अलिकडेच अभिनेता ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला होता. त्यात उपेंद्र लिमयेच्या १० मिनिटांच्या सीनने सध्या एक वेगळीच हवा निर्माण केली. मराठी, हिंदी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर लवकरच तो तेलूगु चित्रपटात काम करताना दिसणार आहे. दाक्षिणात्य अभिनेता व्यंकटेश दग्गुबतीसोबत (venkatesh daggubati) तो स्क्रीन शेअर करणार आहे.


नुकताच सोशल मीडियावर उपेंद्र लिमयेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली आहे. 'संक्रांतिकी वास्तुनम' या चित्रपटातून तो तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'संक्रांतिकी वास्तुनम'चे दिग्दर्शक त्यांच्या कामाचं कौतुक करताना दिसत आहेत. येत्या १४ जानेवारी २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

दरम्यान उपेंद्र लिमयेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सांगताना दिसतोय की, "नमस्कार! हा माझा पहिला तेलुगू व्यावसायिक चित्रपट. याचं नाव आहे 'संक्रांतिकी वास्तुनम'. या चित्रपटाचं शूटिंग काल संपलं आणि आज मी या चित्रपटाचं डबिंग सुद्धा संपवलं आहे.  माझ्या इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये कधीही काल शूटिंग संपवून, लगेच आज डबिंग पूर्ण झालंय, असं कधीच झालेलं नाही. पहिल्यांदाच असं झालंय.  हा एक अत्यंत समृद्ध करणारा व्यावसायिक अनुभव मिळाला. मला ही संधी या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अनिल रवीपुडी यांनी उपलब्ध करून दिली आहे. तेलुगू इंडस्ट्री मधील ब्लॉकबस्टर लेखक-दिग्दर्शक अशी यांची ओळख आहे. सर, तुमचे मनापासून आभार तुमच्याबरोबर काम करताना खूप मजा आली. शिवाय तुम्ही मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे खूप आभार."

पुढे, दिग्दर्शक अनिल रवीपुडी उपेंद्र लिमयेच्या कामाचं कौतुक करत म्हणाले, "मराठीत बोललेलं मला सगळं समजतं. उपेंद्र सरांसोबत काम करून खूप छान वाटलं. हे किती भारी कलाकार आहेत हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. ते कोणतीही भूमिका अगदी सहजरित्या साकारू शकतात. त्यांचं टायमिंग कमाल आहे. सकाळी ९:३० त्यांनी डबिंग सुरू केलं होतं आणि आता रात्रीचे १० वाजलेत. एवढा वेळ त्यांनी डबिंगसाठी काम केलंय. कामाच्या बाबतीत त्यांचं डेडिकेशनही कमाल आहे. शिस्त, वेळेवर येणं, त्यांचं सगळं काही परफेक्ट असतं. या चित्रपटाच्या माध्यमातून उपेंद्र सर वेगळ्या अंदाजात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत."

Web Title: marathi cinema actor upendra limaye entry in telugu film will share the screen with south superstar venkatesh daggubati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.