लग्नघटिका समीप आली! अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात; शेअर केले केळवणाचे खास फोटो 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 02:04 PM2024-12-09T14:04:13+5:302024-12-09T14:07:33+5:30

अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतंच अभिनेत्रीचं केळवण पार पडलं आहे. हेमलने याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

marathi cinema actress hemal ingle will get marry soon shared kelvan photo on social media | लग्नघटिका समीप आली! अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात; शेअर केले केळवणाचे खास फोटो 

लग्नघटिका समीप आली! अभिनेत्री हेमल इंगळे लवकरच अडकणार विवाहबंधनात; शेअर केले केळवणाचे खास फोटो 

Hemal Ingle : मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक बरेच कलाकार मंडळी लग्न करताना दिसत आहेत. अलिकडेच अभिनेत्री रेश्मा शिंदे, 'बिग बॉस मराठी' फेम निखिल राजेशिर्के तसेच अभिषेक गावकर हे कलाकार लग्नबंधनात अडकले. त्यातच आता लवकरच मराठी कलाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री बोहल्यावर चढणार आहे. या अभिनेत्री म्हणजे हेमल इंगळे (Hemal Ingle). अगदी काही महिन्यांपूर्वीच हेमल इंगळेचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर तिच्या बॅचरल पार्टीचीही नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली. अशातच आता अभिनेत्रीच्या केळवणाचे फोटो समोर आले आहेत.


हेमल इंगळेने सोशल मीडियावर तिच्या केळवणाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. मुळची कोल्हापूरची असलेल्या हेमल इंगळेने 'आस'मधून कलाविश्वात पदार्पण केलं होतं. अभिनय बेर्डेसोबत 'अशी ही आशिकी' या चित्रपटात ती झळकली होती. या चित्रपटामुळे ती घराघरात लोकप्रिय झाली. अलिकडेच ती 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात झळकली होती. 

हेमल इंगळेने सोशल मीडियावर केळवणाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहलंय की, "Kelvan szn has been going strong". यावरून अभिनेत्रीच्या घरी लग्नापूर्वींच्या विधींना सुरूवात झाल्याचं कळतंय. दरम्यान, हेमल इंगळेच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव रोनक आहे. अभिनेत्रीने केळवणासाठी खास  निळ्या रंगाचा ड्रेस आणि गळ्यात छानसा नेकलेस घातला आहे. हेमल इंगळेने शेअर केलेल्या फोटोवर सध्या नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Web Title: marathi cinema actress hemal ingle will get marry soon shared kelvan photo on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.