होने दे नैन मटक्का! वरुण धवनच्या गाण्यावर किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले- "एकच नंबर..."
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 11:53 AM2024-12-11T11:53:59+5:302024-12-11T11:56:16+5:30
वरुण धवनच्या 'बेबी जॉन' चित्रपटातील 'होने दे नैन मटक्का' गाण्यावर अभिनेत्री किशोरी शहाणेंचा जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Kishori Shahane: अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) या मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी ९० चा काळ गाजवला. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपला वेगळा ठसा उमटवला आहे. किशोरी शहाणेंचासोशल मीडियावरही चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्यांच्या कामाबरोबरच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असतात. सोशल मीडियावर त्या वेगवेगळे फोटो तसेच व्हिडीओ पोस्ट करून चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. याशिवाय त्यांना डान्सची आवड असून सोशल मीडियावर नेहमीच डान्सचे तसेच व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
किशोरी शहाणे सोशल मीडियावर कमालीच्या सक्रीय आहेत. त्यामुळे त्या कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काही ना काही पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी चित्रपट ‘बेबी जॉन’मधील ‘नैन मटक्का’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. त्यांच्या या व्हिडीओचं नेटकरी कौतुक करत आहेत.
दरम्यान, किशोरी शहाणे यांनी 'सगळीकडे बोंबाबोंब', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'दुर्गा झाली गौरी', 'मोरुची मावशी' अशा कितीतरी चित्रपट, नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही त्या झळकल्या होत्या. सध्या किशोरी शहाणे या झी टीव्ही वाहिनीवरील 'कैसे मुझे तुम मिल गए' या हिंदी मालिकेत काम करताना दिसताना आहेत. या मालिकेत त्यांनी बबिता आहुजा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.