वयाच्या पन्नाशीतही स्लिम-ट्रिम, किशोरी शहाणे यांचा थक्क करणारा फिटनेस; वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 09:58 AM2024-10-23T09:58:33+5:302024-10-23T10:00:19+5:30

किशोरी शहाणे (Kishori Shahane) या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत.

marathi cinema actress kishori shahane fitness share video of gym workout netizens react | वयाच्या पन्नाशीतही स्लिम-ट्रिम, किशोरी शहाणे यांचा थक्क करणारा फिटनेस; वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल 

वयाच्या पन्नाशीतही स्लिम-ट्रिम, किशोरी शहाणे यांचा थक्क करणारा फिटनेस; वर्कआऊट व्हिडीओ व्हायरल 

Kishori Shahane: किशोरी शहाणे (Kishori Shahane) या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याच्या जोरावर त्यांनी ९० चा काळ गाजवला. किशोरी शहाणे यांचा आजही इंडस्ट्रीमध्ये यशस्वीपणे सक्रीय आहे. इतकंच नाही तर त्यांचा सोशल मीडियावरही तितकाच दांडगा वावर आहे. दरम्यान अशातच त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


नुकताच किशोरी शहाणे यांनी त्यांचा जीममधील वर्कआउट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. किशोरी शहाणे  त्यांच्या फिटनेसकडे कटाक्षाने लक्ष देत असतात.

या व्हिडिओत ५५ वर्षीय किशोरी शहाणे थक्क करणारं आणि सगळ्यात कठीण वर्कआऊट करताना दिसत आहेत. किशोरी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. "Working hard today for better Tomorrow..." असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलंय. विशेष म्हणजे व्हिडीओमध्ये त्या वेटलिफ्टिंग करताना दिसत आहेत. किशोरी यांचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.  या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. 

सगळीकडे बोंबाबोंब', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'दुर्गा झाली गौरी', 'मोरुची मावशी' अशा कितीतरी चित्रपट, नाटक आणि आता मालिकांच्या माध्यमातून किशोरी शहाणे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. नुकत्याच सुरू झालेल्या 'कैसे मुझे तुम मिल गये' या मालिकेत त्या नायकाच्या आईची व्यक्तिरेखा साकारत आहेत.

Web Title: marathi cinema actress kishori shahane fitness share video of gym workout netizens react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.