कधी नेपोटिझमचा सामना करावा लागला का? किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:28 IST2025-04-23T15:14:09+5:302025-04-23T15:28:34+5:30
"बिझनेसमनचा मुलगा बिझनेस करतो तर...", नेपोटिझमबद्दल किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी स्पष्टच बोलला

कधी नेपोटिझमचा सामना करावा लागला का? किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी म्हणाला...
Kishori Shahane Son Bobby Vij Talk About Nepotism: किशोरी शहाणे (Kishori Shahane) या मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत . ९० च्या दशकात त्यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ‘प्रेम करु या खुल्लम खुल्ला’, ‘वाजवा रे वाजवा’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘सगळीकडे बोंबाबोंब’ अशा असंख्य सुपरहिट चित्रपटांमध्ये किशोरी शहाणे झळकल्या आहेत. आजही किशोरी शहाणे कलाविश्वात सक्रीय आहेत. प्रसिद्धीच्या झोतात असतानाच१९९१ साली त्यांनी दीपक बलराज वीज यांच्यासोबत विवाह केला. दरम्यान, किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी विज देखील त्याच्या आई-वडिलांप्रमाणेच इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करत आहे. तो एक उत्तम डान्सर, अभिनेता आणि मॉडेल आहे. अशातच नुकत्याच दिलेल्या एक बॉबीने नेपोटिझमबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे.
नुकतीच किशोरी शहाणे आणि त्यांचा मुलगा बॉबीने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बॉबी विजला कधी नेपोटिझमचा सामना करावा लागला का? याकडे तू कसं बघतोस? याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना बॉबी म्हणाला, "खरं सांगायचं झालं तर मला यामुळे काहीच फरक पडत नाही. मी असा विचारच करत नाही की नेपोटिझमुळे मला फायदा होणार आहे. तर मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून येवढं सगळं काम केलंच नसतं. मला असं वाटतं जे काही असेल ते मला स्वत: ला करायचं आहे. आई-बाबा आहेतच पण मला त्याचा सपोर्ट महत्वाचा आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे."
पुढे बॉबी म्हणाला, "काही घरांमध्ये असंही असतं की, आई-वडिलांना समजत नाही की हे अभिनय क्षेत्र म्हणजे नक्की काय आहे. पण, मला कायम त्यांनी कायम पाठिंबा दिला. हा प्रवास माझा आहे, त्यामुळे वेगळा असा काही फायदा मिळाला नाही. शिवाय मला आणखी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की, नेपोटिझम काय असतं? आई-बाबांनी काम केलंय आता मी सुद्धा त्याच क्षेत्रात आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येक क्षेत्रात असं होत असतं. बिझनेसमनचा मुलगा बिझनेस करतो तर वकिलाचा मुलगा वकिली करतो, हा एक संस्काराचा भाग झाला. तुम्ही आपल्या पालकांचा प्रवास बघून त्यांच्याकडून खूप काही शिकता, त्यांना बघून तुम्हाला प्रेरणा मिळते. हे सारखंच आहे. असं काही नाही की, त्यांच्या प्रसिद्धीचा तुम्हाला करिअरमध्ये फायदा झाला आहे. हा प्रवास माझा आहे, त्यामुळे मला अशा गोष्टींची काही गरज वाटत नाही. मला आनंद आहे माझे आई-वडील खूप सपोर्टिव्ह आहेत. " असं वक्तव्य किशोरी शहाणेंच्या मुलाने केलं.