'ओ सजनी रे...' ट्रेंडिंग गाण्यावर मैत्रिणीसह मिथिलाही थिरकली; चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 02:56 PM2024-05-31T14:56:59+5:302024-05-31T15:01:49+5:30

अभिनेत्री, सोशल मीडियास्टार मिथिला पालकर हे नाव कायमच चर्चेत असतं.

marathi cinema actress mithila palkar dance with her friend after 3 years video goes viral on social media  | 'ओ सजनी रे...' ट्रेंडिंग गाण्यावर मैत्रिणीसह मिथिलाही थिरकली; चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक 

'ओ सजनी रे...' ट्रेंडिंग गाण्यावर मैत्रिणीसह मिथिलाही थिरकली; चाहत्यांनी केलं तोंडभरून कौतुक 

Mithila Palkar : अभिनेत्री, सोशल मीडियास्टार मिथिला पालकर हे नाव कायमच चर्चेत असतं. मिथिला पालकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका तसेच वेबसीरीजमध्ये तिने काम केलं आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर मिथिलाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. नुकताच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

नृत्य, संगीत आणि अभिनय क्षेत्रात सक्रिय असणारी ही अभिनेत्री  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा मिथिला सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह असल्याची पाहायला मिळते. सोशल मीडियावर तिची तगडी फॅनफोलोइंगही आहे. मिथिलाने नुकताच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्री तिच्या मैत्रीणीसह डान्स करताना दिसते आहे. सध्या इंटरनेटवर ट्रेंडिगला असणारं 'लापता लेडीज' या सिनेमातील 'ओ सजनी रे' या गाण्यावर तिने ठेका धरला आहे. मिथिलाच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमध्ये नृत्य करताना मिथिला आणि तिच्या मैत्रीणीने दोघींनीही पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. 

आतापर्यंत मिथिलाचा हा व्हिडिओ १ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून नेटकऱ्यांना मिथिलाची नृत्यशैली आवडल्याचं दिसतंय. अभिनेत्री प्राजक्ता कोळीने देखील तिच्या या व्हिडिओवर 'My Sajni' अशी कमेंट केली आहे. तसेच ईरा खानने देखील या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. 

"जवळपास ३ वर्षांनी आम्ही एकत्र डान्स करत आहोत. तुझ्यासोबत डान्स करणं हे माझं भाग्यच आहे. यासाठी मी खूप आनंदी आहे". असं कॅप्शन देत मिथिलाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

वर्कफ्रंट- 

साधारणत: २०१४ मध्ये अभिनेत्री मिथिला पालकरने 'माझं हनीमुन' या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. १६ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्ट फिल्म प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानंतर तिने वेगवेगळ्या मराठी, हिंदी सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांची मनं जिंकली.  'मुरांबा','कट्टी-बट्टी' 'कारावॉं, 'लिटिल थिंग्स' यांसारखे चित्रपट तसेच वेबसिरिजमध्ये तिने केलेल्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. 

Web Title: marathi cinema actress mithila palkar dance with her friend after 3 years video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.