'करंज्या, लाडू अन् बरंच काही...', मिथिला पालकर बनवतेय दिवाळीचा फराळ, शेअर केला सुंदर व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2024 12:58 IST2024-10-31T12:54:30+5:302024-10-31T12:58:26+5:30
सध्या सर्वत्र दिवाळीच्या(Diwali) निमित्ताने उत्साहाचं, चैत्यन्याचं वातावरण आहे.

'करंज्या, लाडू अन् बरंच काही...', मिथिला पालकर बनवतेय दिवाळीचा फराळ, शेअर केला सुंदर व्हिडीओ
Mithila Palkar : सध्या सर्वत्र दिवाळीच्या(Diwali) निमित्ताने उत्साहाचं, चैत्यन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. सणासुदीच्या काळात घरात फराळ, शुभेच्छा या बरोबर पाहूण्यांची रेलचेल असते. सर्वसामान्याप्रमाणे सेलिब्रिटींच्याही घरी दिवाळीची लगबग पाहायला मिळते आहे. घराची साफसफाई, सजावट तसेच फराळ बनवण्यात काही जण व्यस्त आहेत. अशातच नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्री, रिलस्टार मिथिला पालकरचा (Mithila Palkar) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मिथिला दिवाळीचा फराळ बनवताना दिसते आहे.
मिथिला पालकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आहे. आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळे मराठी चित्रपट, मालिका तसेच वेबसीरीजमध्ये तिने काम केलं आहे. नुकताच मिथिला पालकरने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती दिवाळीचा फराळ बनवण्यात मग्न झाल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडीमध्ये मिथिला सुबक करंज्या, बेसनाचे लाडू करताना दिसते आहे. चला चला दिवाळी आली! असं कॅप्शन देत अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे.
मिथिला पालकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने 'मुरांबा', 'कट्टीबट्टी', 'कारवां', 'चॉपस्टिक' अशा सिनेमांमध्ये तिने काम केलंय.