"सर्वात कठीण गोष्ट म्हणजे..." लाडक्या लेकाला निरोप देताना निवेदिता सराफ झाल्या भावुक; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2024 03:06 PM2024-09-06T15:06:51+5:302024-09-06T15:09:31+5:30

निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.

marathi cinema actress nivedita saraf was emotional while saying goodbye to her beloved son aniket post has been viral on social media  | "सर्वात कठीण गोष्ट म्हणजे..." लाडक्या लेकाला निरोप देताना निवेदिता सराफ झाल्या भावुक; म्हणाल्या...

"सर्वात कठीण गोष्ट म्हणजे..." लाडक्या लेकाला निरोप देताना निवेदिता सराफ झाल्या भावुक; म्हणाल्या...

Nivedita Saraf Viral Post : अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. गेल्या कित्येक दशकांपासून ते अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. मराठी सिनेसृष्टीत त्याचं नाव मोठ्या अदबीने घेतलं जातं. पण, सध्या निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून परदेशात लेकाला एकट्याला सोडून भारतात परतताना निवेदिता सराफ भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. 


बऱ्याचदा एखाद्या कलाकाराचा मुलगा आहे म्हणजे त्याला देखील अभिनयात रूची असणार, असा साधारण अनेकांचा समज असतो. पण, अशोक सराफ यांच्या मुलाने अभिनयाचा वारसा असतानाही वेगळी वाट निवडली. अनिकेत सराफ हा एक उत्तम शेफ आहे. तर पाश्चिमात्य पद्धतीचे जेवण बनवण्यात त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे अनिकेत सराफ नोकरीनिमित्ताने परदेशातच राहतो. अलिकडेच परदेशात स्थायिक असलेल्या आपल्या तब्बल चार वर्षांनी अशोक सराफ आणि निवेदिता भेटायला गेले. त्याची माहिती निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियाच्या आधारे दिली होती. लंडनमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत आपल्या लेकासोबत भ्रमंती करतानाही ते दिसले.  

दरम्यान,  निवेदिता सराफ यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अनिकेतसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलंय, "Most difficult thing in your life is saying goodbye to your child..." असं म्हणत त्यांनी लाडक्या  लेकाला हसत मुखाने निरोप दिला आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनिकेतबद्दल सांगायचं झालं तर, अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने लंडनमधील ऑक्सफोर्ड इंग्लिश सेंटर येथे मुलाखत दिली होती. इंग्लिश या सेकंड लॅग्वेजसाठी तिथे त्याची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच त्याने हा पदभार स्विकारला आहे. 

Web Title: marathi cinema actress nivedita saraf was emotional while saying goodbye to her beloved son aniket post has been viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.