"कजरा मोहब्बत वाला..." प्रिया बापटचा मंत्रमुग्ध करणारा आवाज; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:18 IST2024-10-30T14:16:06+5:302024-10-30T14:18:44+5:30
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.

"कजरा मोहब्बत वाला..." प्रिया बापटचा मंत्रमुग्ध करणारा आवाज; नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Priya Bapat : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat) . वेगवेगळ्या मालिका, चित्रपट तसेच वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीचा दांडगा वावर आहे. अभिनयाव्यतिरिक्त प्रिया उत्तम गायिका देखील आहे. अलिकडेच प्रिया 'रात जवॉं हैं' या वेब सीरिजमुळे चर्चेत आली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कायमच तिचे गाणी गातानाचे व्हिडीओ शेअर करत असते.
अलिकडेच प्रियाने झी मराठी अवॉर्ड्सच्या सोहळ्यामध्ये 'आभाळमाया 'मालिकेचं शीर्षकगीत गायलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला होता. तो व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थितीत कलाकारांची प्रियाने तिच्या सुमधुर गायिकेने मनं जिंकली.
दरम्यान, प्रियाचा बापटचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती "कजरा मोहब्बत वाला..." हे गाणं गाताना दिसते आहे. सोबतच 'द तबला Guy' निखिल परळीकर देखील आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने १९६८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किस्मत' चित्रपटातील गाणं गाऊन अनेकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आशा भोसले आणि शमशद बेगम यांनी या गाण्याला आवाज दिला आहे.