सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त वर्कआऊट; चाहत्यांना देतेय फिटनेसचे धडे; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:48 IST2025-02-18T17:47:21+5:302025-02-18T17:48:43+5:30
सोनाली कुलकर्णीचा थक्क करणारा फिटनेस, शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ.

सोनाली कुलकर्णीचा जबरदस्त वर्कआऊट; चाहत्यांना देतेय फिटनेसचे धडे; व्हिडीओ व्हायरल
Sonali Kulkarni: मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni). आपल्या उत्तम अभिनयासह उत्कृष्ट नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. सोनाली कुलकर्णी नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमुळे ती चर्चेत आली आहे.
सोनाली कुलकर्णीला फिटनेसचं प्रचंड वेड आहे. नुकताच तिने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलाय. यामध्ये ती एका जीममध्ये जबरदस्त वर्कआऊट करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओचं नेटकरी कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहते थक्क झाले आहेत.
वर्कफ्रंट
सोनाली कुलकर्णीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिने 'गाढवाचं लग्न', 'क्षणभर विश्रांती', 'अजिंठा', 'मितवा',' नटरंग', पोश्टर गर्ल', 'हिरकणी' या सिनेमांतून प्रेक्षकांची मनं जिंकली. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.