महाराष्ट्रात राहून...यासारखे मोठे दुर्दैव नाही..., ‘शेर शिवराज’फेम अक्षय वाघमारेनं केला जाहीर निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:00 AM2022-04-29T10:00:35+5:302022-04-29T10:14:23+5:30

Akshay Waghmare Post : ‘मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम’ अशा आशयाची अभिनेता अक्षय वाघमारेची पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.

marathi cinema and prime time sher shivraj fame akshay waghmare post | महाराष्ट्रात राहून...यासारखे मोठे दुर्दैव नाही..., ‘शेर शिवराज’फेम अक्षय वाघमारेनं केला जाहीर निषेध

महाराष्ट्रात राहून...यासारखे मोठे दुर्दैव नाही..., ‘शेर शिवराज’फेम अक्षय वाघमारेनं केला जाहीर निषेध

googlenewsNext

मराठमोळे  दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांचा ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) हा सिनेमा गेल्या 22 एप्रिलला प्रदर्शित झाला. शिवरायांची शौर्यगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाला प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अगदी 500 पेक्षा अधिक चित्रपटाचे शो हाऊसफुल चालले. अद्यापही हा चित्रपट गर्दी खेचतोय.  चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. परंतु सध्या या मराठी चित्रपटालाच महाराष्ट्रात प्राईम टाईमसाठी झगडावं लागतंय. आता याविरोधात  ‘शेर शिवराज’ या चित्रपटात सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) याने जोरदार आवाज उठवला आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे, यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. ‘मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम’ अशा आशयाची त्याची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.

वाचा अक्षयची पोस्ट, त्याच्याच शब्दांत...

मराठी चित्रपट आणि प्राईम टाईम

मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटा साठी झगडावे लागत आहे यासारखे दुसरे दुर्दैव नाही .
याविषयी यापूर्वी देखील अनेकदा या विषयी बोलले गेले आहे पण पुढे काहीच साध्य झाले नाही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला . फर्जंद , फत्तेशिकस्त , पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचायला हवा , नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा. स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण या आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्त पणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स . सगळे प्राईम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार ?? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का ?? जी व्यवस्था हे सगळं बघत आहेत त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबनार आहेत की नाही ? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील .

मराठी माणसाने म्हणजे सन्मानीय दादा साहेब फाळके यांनी हि चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत .
जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनी देखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे .
आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार ???
बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही ... मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे.

प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ...

Web Title: marathi cinema and prime time sher shivraj fame akshay waghmare post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.