"अशोक आणि लक्ष्या यांच्यामुळे मराठी सिनेइंडस्ट्री जिवंत राहिली...", निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:59 IST2025-03-18T12:57:59+5:302025-03-18T12:59:32+5:30

Nivedita Saraf, Ashok Saraf And Laxmikant Berde : अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेंमुळे मराठी सिनेइंडस्ट्री जिवंत राहिली असल्याचे म्हटले आहे.

"Marathi cinema industry survived because of Ashok Saraf and Laxmikant Berde...", expresses Nivedita Saraf's feelings | "अशोक आणि लक्ष्या यांच्यामुळे मराठी सिनेइंडस्ट्री जिवंत राहिली...", निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

"अशोक आणि लक्ष्या यांच्यामुळे मराठी सिनेइंडस्ट्री जिवंत राहिली...", निवेदिता सराफ यांनी व्यक्त केल्या भावना

९०च्या दशकात अशोक सराफ (Ashok Saraf) आणि लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) या जोडीनं आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना आपलेसं केलं. या जोडीचे सिनेमे आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात आणि खळखळून हसतात. 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रम्हचारी', 'धूमधडाका', 'शेजारी शेजारी' हे त्यांचे गाजलेले सिनेमे आहेत. एक काळ या जोडीने गाजविला होता. नुकतेच अशोक सराफ यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डेंमुळे मराठी सिनेइंडस्ट्री जिवंत राहिली असल्याचे म्हटले आहे.

नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या खास प्रसंगी दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची उणीव सर्वांनाच भासत होती. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आभासी फोन आला आणि त्यांचा आवाज ऐकून सर्वजण त्यांच्या आठवणींमध्ये हरपून गेले. या पुरस्कार सोहळ्यात निवेदिता सराफ यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी तारांगणला मुलाखत देताना अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीबद्दल आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या की, जेव्हा संपूर्ण चित्रपटसृष्टी डबघाईला आली होती तेव्हा अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांनी तिला जीवित ठेवलं. ज्यामुळे आपण आज हे सगळे दिवस बघतो आहे.

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार आधीच मिळायला हवा होता
अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार यांना मिळाला, त्यावर निवेदिता सराफ पुढे म्हणाल्या की, देर आए दुरुस्त आए असं आपण म्हणू शकतो. पद्मश्री सारखा एवढा मोठा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाला, त्यासाठी मी केंद्र सरकारचे आभार मानते. मला असं वाटतं हा पुरस्कार थोडा आधी मिळायला हवा होता. पण देर आए दुरुस्त आए.. त्यांचं कतृत्व खरंच तेवढं मोठं आहे. 

Web Title: "Marathi cinema industry survived because of Ashok Saraf and Laxmikant Berde...", expresses Nivedita Saraf's feelings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.