आई-वडिलांना गमावलं, लोकांनी वेडं ठरवलं; 'बाबा लगीन' फेम अभिनेत्याची मन हेलावून टाकणारी कहाणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 01:05 PM2024-09-04T13:05:55+5:302024-09-04T13:10:06+5:30

'पछाडलेला'मध्ये 'बाबा लगीन' म्हणत 'सिनेमात भाव खाऊन गेला तो अभिनेता म्हणजे अमेय हुनासवाडकर.

marathi cinema pachadlela fame actor amey hunaswadkar revealed in interview about her journey in film industry | आई-वडिलांना गमावलं, लोकांनी वेडं ठरवलं; 'बाबा लगीन' फेम अभिनेत्याची मन हेलावून टाकणारी कहाणी 

आई-वडिलांना गमावलं, लोकांनी वेडं ठरवलं; 'बाबा लगीन' फेम अभिनेत्याची मन हेलावून टाकणारी कहाणी 

Amey Hunaswadkar : 'पछाडलेला' हा मराठी चित्रपट महेश कोठारेंचा सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटापैंकी एक आहे. या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. त्यातील 'भुसनाळ्या', 'बाब लगीन', 'मालक-मालक', 'डोळे बघ डोळे बघ', हे संवाद चांगलेच लोकप्रिय ठरले. २००४ साली हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. शिवाय चित्रपटातील 'बाबा लगीन... ढिनच्याक ढिच्याक' हा डायलॉग प्रेक्षकांना प्रचंड आवडला. चित्रपटाप्रमाणे त्यातील पात्र अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, भरत जाधव, श्रेयस तळपदे, अभिराम भडकमकर अशी तगडी स्टारकास्ट होती. 

'पछाडलेला'मध्ये 'बाबा लगीन' म्हणत 'सिनेमात भाव खाऊन गेला तो अभिनेता म्हणजे अमेय हुनासवाडकर. अमेयला या सिनेमाने खरा स्टारडम मिळवून दिला. वेगवेगळ्या मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये अमेयने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

नुकतीच अभिनेता अमेय हुनासवाडकर याने 'इट्स मज्जा'च्या #ठाकूर विचारणार या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. त्या दरम्यान दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील कठीण प्रसंगावर भाष्य केलं. मुलाखती दरम्यान तो म्हणाला, "फिल्म इंडस्ट्रीत तेवढे संपर्क झाले नाहीत. एकदा चित्रपट झाला की मैत्री संपते, असं म्हटलं जातं. पण माझा अनुभव थोडा वेगळा आहे. मधल्या काळामध्ये मी खूपच आजारी होतो. आई-बाबा नसल्यामुळे मला काय करायचं ते कळलंच नाही. तेव्हा 'अजब प्रेम की गजब कहानी' मधील मित्रमंडळी माझ्या आजारपणात धावून आली. हे सगळेच मित्र त्यावेळेस माझ्याबाजूनने उभे होते. तेव्हा ते म्हणाले, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. आज मी जो काही ठणठणीत दिसतोय ते फक्त त्यांच्यामुळे शक्य झालं आहे. त्यावेळी त्यांनी मला खूप मदत केली". 

पुढे अभिनेता म्हणाला, "काही चुकीच्या उपचार पद्धतीमुळे माझं आजारपण आणखी बळावलं. अशावेळी माझे नातेवाईकही जवळ नव्हते. कशाचीही अपेक्षा न ठेवता माझ्या मित्रांनी मला खूप साथ दिली.मधल्या काळामध्ये ९ वर्ष मी घरी होतो. माझी आई अंथरुणात होती. तर त्या काळात इंडस्ट्रीतील एक स्टार मला भेटला आणि म्हणाला, की ९ वर्ष तू दारूत घालवली. पण माझं बॅकग्राउंड जाणून न घेता असं त्यांनी चार लोकांमध्ये बोलून दाखवलं, आणि याचं मला खूप वाईट वाटलं". असा खुलासा देखील अमेयने या मुलाखतीत केला. 

Web Title: marathi cinema pachadlela fame actor amey hunaswadkar revealed in interview about her journey in film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.