लग्नाला ५ महिने पूर्ण होताच क्षितीजाने शेअर केला खास व्हिडीओ; बायकोला शुभेच्छा देत प्रथमेश म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:21 PM2024-07-24T15:21:52+5:302024-07-24T15:29:08+5:30
प्रथमेश परब हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे.
Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Video : प्रथमेश परब हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'टाइमपास', 'बालक-पालक', 'टकाटक' तसेच 'डिलिव्हरी बॉय', उर्फी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. अगदी अल्पावधीतच प्रथमेश परबने सिनेसृष्टीत नाव कमावलं.
अलिकडेच अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर सोबत लग्नगाठ बांधली. प्रथमेश आणि क्षितीजाच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. दरम्यान, हे जोडपं सोशल मीडयावर कायमच सक्रिय असून आपल्या संबंधित वेगवेगळे व्हिडीओज तसेच फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
नुकताच क्षितीजाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुकतीच प्रथमेश आणि क्षितीजाच्या सुखी संसाराला पाच महिने पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेत्याने आपल्या बायकोला खास अंदाजात शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रथमेश परब त्याच्या घरातील सोफ्यावर बसलेला आहे. त्याला हसताना पाहून क्षितीजा भलताच विचार करते. तिला वाटतं आपल्या लग्नाला ५ महिने पूर्ण झाले म्हणून हा माझ्याबद्दलच विचार करत असणार; पण जेव्हा ती त्याच्या मनात नेमकं काय चाललंय, हे जाणून घेण्यासाठी ती त्याच्याजवळ जाते. त्या दरम्यान प्रथमेश 'तौबा तौबा' गाणं गात माझा विचार करत असेल असा विचार ती करते. पण प्रत्यक्षात काही चित्र काही वेगळंच असतं. प्रथमेश क्षितीजाचा विचार करत नसून तो मनातल्या मनात 'टी २० वर्ल्डकप'मध्ये सूर्यकुमार यादवने जो अप्रतिम झेल घेतला त्याच्याबद्दल विचार करत असतो. हे जाणून क्षितीजाचा हिरमोड होतो आणि ती त्याच्यावर रागावते.
सध्या सोशल मीडियावर प्रथमेश-क्षितीजाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. शिवाय नेटकरी या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
प्रथमेश - क्षितीजा या दोघांनी २४ फेब्रुवारीला एकमेकांशी लग्न केलं. या दोघांच्या लग्नाला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. प्रथमेश - क्षितीजा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. अखेर फेब्रुवारी २०२४ मध्ये दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. लग्नानंतर गृहप्रवेशाच्या वेळी क्षितीजाने घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला होता.