Kedar Shinde : ‘पण खंत एकच आहे की शिवसेनेचा...’; दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 02:43 PM2022-06-19T14:43:52+5:302022-06-19T14:49:17+5:30

Kedar Shinde Post : आज शिवसेनेचा ५६वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर केदार शिंदे यांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

marathi director kedar shinde post on shivsena and shahir sable | Kedar Shinde : ‘पण खंत एकच आहे की शिवसेनेचा...’; दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

Kedar Shinde : ‘पण खंत एकच आहे की शिवसेनेचा...’; दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

केदार शिंदे (Kedar Shinde) या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मराठीतील दिग्गज दिग्दर्शकांच्या यादीत त्यांचं नाव येतं. शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा. लवकरच केदार शिंदे आजोबा शाहीर साबळे यांच्या आयुष्यावरचा ‘महाराष्ट्र शाहीर’ नावाचा सिनेमा घेऊन येत आहेत. याच चित्रपटाच्या आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या ( Shiv Sena Vardhapan Din) निमित्ताने केदार शिंदे यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

शाहीर साबळे यांच्या लेकीने ही पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये शाहीर साबळे व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणी ताज्या केल्या आहे. बाळासाहेब-शाहीर साबळे यांचं अतूट नातं होतं. शिवसेना स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून शाहीर, बाळासाहेबांसोबत होते. 

वाचा पोस्ट...
आज शिवसेनेचा स्थापना दिवस...जून्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या...ठाकरेकाका ( बाळासाहेब ठाकरे ) यांच बाबांना भेटायला आमच्या घरी येणं...बाबांच मातोश्रीवर वरचेवर जाणं...फोनवरुनही सतत चर्चा करणं..महाराष्ट्रभर आमच्या गाडीने दोघांनीच केलेला दौरा...पश्चीम महाराष्ट्रातल्या त्या वेळच्या मोठमोठ्या नेत्यांच्या दहशतीला न जूमानता बाबांनी ठाकरेकाकांच्या ठीकठीकाणी भरवलेल्या सभा...शिवसेनेचा विचार ठामपणे तरुणांपुढे यावा म्हणून निर्माण केलेलं ‘आंधळं दळतयं’ मुक्तनाट्य...जागृत झालेल्या मराठी तरुणांनी परप्रांतीयांविरुध्द पेटवलेली पहीली दंगल...बाबांचे आणि ठाकरे काकांचे टॅप होणारं फोन संभाषण...दंगलीनंतर एका प्रसीध्द इंग्रजी दैनिकाने बाबांचा भलामोठा फोटो वर्तमानपत्रात छापून ‘ बाळासाहेबांना गुमराह करणारा हाच तो रक्त पीपासू माणूस’ म्हणून केलेली बाबांची नीर्भत्सना...शिवसेनेने राजकारणात पडू नये म्हणून बाबांनी केलेला आटापीटा...एेंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रीद असलेल्या शिवसेनेच राजकारणातच सक्रीय होणं आणि बाबांच शिवसेनेपासून दूर होणं...आज हे सर्व आठवतंय...शेवटपर्यंत शिवसेनेलाच मत देणारे बाबा आणि शेवटपर्यंत साबळे कुटूंबावर प्रेम करणारे ठाकरे काकाही आठवतायत...पण खंत एकच आहे की शिवसेनेचा इतिहास लिहीला जाईल तेंव्हा त्यात बाबांच्या योगदानाचा उल्लेख नसेल...मात्र बाबांना श्रध्दांजली वाहाताना उद्धव ठाकरे याचा उल्लेख करायला विसरले नाहीत, हे ही कमी नाही...आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी आमच्या कुटुंबाबरोबर तसंच स्नेहपुर्ण नात टिकवून ठेवलंय...शिवसेना शतायु होवो...मराठी आणि शिवसेना हे समीकरण आबाधीत राहो.....जय महाराष्ट्र..., अशी शाहीर साबळे यांच्या कन्या वंसुधरा साबळे यांनी लिहिलेली पोस्ट केदार शिंदे यांनी पुन्हा शेअर केली आहे. 

Web Title: marathi director kedar shinde post on shivsena and shahir sable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.