अक्षय कुमारचा 'चुंबक' चित्रपट पोहोचला मेलबर्नला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 03:17 PM2018-07-03T15:17:41+5:302018-07-03T15:18:45+5:30

गतिमंदतेची समस्या असलेला आणि मुळचा सोलापूरमधील एका छोट्याशा गावातील असलेला प्रसन्ना ही भूमिका त्यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी व्यक्तिरेखा संग्राम देसाई या चित्रपटात पदार्पण करणाऱ्या, मुळचा कोल्हापूरचा असलेल्या संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारली आहे.

Marathi Film backed by Akshay Kumar starring musician Swanand Kirkire heads to Melbourne! | अक्षय कुमारचा 'चुंबक' चित्रपट पोहोचला मेलबर्नला !

अक्षय कुमारचा 'चुंबक' चित्रपट पोहोचला मेलबर्नला !

googlenewsNext

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार याची प्रस्तुती असलेला ‘चुंबक चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच रसिकांमध्ये अधिक उत्सकुता पाहायला मिळत आहे.स्वानंद किरकिरे हे चित्रपटातील प्रमुख भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहेत. गतिमंदतेची समस्या असलेला आणि मुळचा सोलापूरमधील एका छोट्याशा गावातील असलेला प्रसन्ना ही भूमिका  त्यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी व्यक्तिरेखा संग्राम देसाई या चित्रपटात पदार्पण करणाऱ्या, मुळचा कोल्हापूरचा असलेल्या संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारली आहे.

विशेष म्हणजे इंडियन फिल्म फेस्टीव्हल ऑफ मेलबर्न (आयएफएफएम) सध्या नववे वर्ष साजरे करत असून 10 ते 22 ऑगस्ट दरम्यान ‘इनक्लूजन’ थीम अंतर्गत फेस्टिव्हलचा शुभारंभ होणार आहे. हे फेस्टिव्हल मल्टी-अवॉर्ड विनिंग आहे. तसेच दक्षिण गोलार्धावरील सर्वात आलिशान मानल्या जाणाऱ्या व 12 दिवस चालणाऱ्या या भारतीय सिनेमाच्या वार्षिक जल्लोषाची बातमी अलीकडे जाहीर करण्यात आली. दरवर्षी हे फेस्टिव्हल ऑस्ट्रेलियन आणि उपखंडातील प्रेक्षकांना वेगवेगळ्या भाषांमधील विविधांगी भारतीय सिनेमा पाहण्याची संधी उपलब्ध करून देते. यंदा आयएफएफएममध्ये 'चुंबक' या मराठी  चित्रपटाचे स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

हा चित्रपटात  संदीप मोदी यांनी दिग्दर्शित केला  ही कथा 15 वर्षीय टेबल साफ करणारा बाळू आणि 45 वर्षीय गतिमंद प्रसन्न यांच्या मैत्रीची आहे. स्वप्न आणि नैतिकता गोष्टीची सांगड असलेली कथा चित्रपटाच रसिकांना पाहायला मिळणार आहे.'चुंबक' ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती, जीवनाला आकार देणाऱ्या त्यांच्या आवडीची कहाणी आहे.  अक्षय कुमारला  हे कथानक भावल्यामुळे त्याने मुंबईत स्क्रीनिंग ठेवण्याचे निश्चित केले. भारतात चुंबक 27 जुलै रोजी प्रदर्शित होत आहे. 

“एक निरागस आणि गतिमंद अशा पुरुषाची व्यक्तिरेखा मला रूपेरी पडद्यावर साकारायची होती. आपल्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण करत आणि त्यांच्या जोडीला या क्षेत्रातील डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याशी चर्चा करत या  व्यक्तिरेखांचा विचार केला गेला. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो अशी भावना जागृत करणा-या व्यक्तिरेखा असाव्यात  त्यानुसार अतिशय बारकाईन यावर मेहनत केल्याचे दिग्दर्शक संदीप मोदी यांनी सांगितले.

Web Title: Marathi Film backed by Akshay Kumar starring musician Swanand Kirkire heads to Melbourne!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.