'रणांगण'च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी नायिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 09:35 AM2018-04-12T09:35:45+5:302018-04-12T15:05:45+5:30

आपण कधीतरी चित्रपटात दिसावं, हे स्वप्न उराशी बाळूगून कित्येक अभिनेत्री आपल्या कारकिर्दीची सुरूवात करतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात तर ...

Marathi filmmaker got the award for 'Battlefield' | 'रणांगण'च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी नायिका

'रणांगण'च्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवी नायिका

googlenewsNext
ण कधीतरी चित्रपटात दिसावं, हे स्वप्न उराशी बाळूगून कित्येक अभिनेत्री आपल्या कारकिर्दीची सुरूवात करतात. काहींची स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात तर काही आपल्या रोजच्या जीवनात मग्न असताना आयुष्याला एक सुंदर वळण आपसूकच मिळून जातं.काहीशी अशीच गोष्ट आहे रणांगण चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रणाली घोगरेची.अभिनयक्षेत्राची फारशी ओळख नसताना प्रणाली अचानक या अभिनयक्षेत्राशी जोडली गेली आणि क्षेत्राचीच होऊन गेली. राजश्री प्रोडक्शन्सच्या ‘मेरे रंग में रंगनेवाली’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आलेल्या या अभिनेत्रीने निखिल अडवानींच्या गुड्डू इंजिनीयर या शॉर्ट फिल्ममध्येही काम केलं. त्यानंतर मंचुकुरीसी वेल्लालो या तेलगू चित्रपटातून ही मराठमोळी अभिनेत्री साऊथमध्ये दिसली.आता ही साऊथ सुंदर रणांगण चित्रपटातून आपल्या मराठी पदार्पणाला सज्ज झाली आहे.

Also Read:सचिन पिळगांवकर दिसणार शिक्षण मंत्र्याच्या भूमिकेत

आपल्या पदार्पणातच प्रणालीला सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, सुचित्रा बांदेकर,आनंद इंगळे, सिध्दार्थ चांदेकरसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाल्यामुळे प्रणाली भलतीच आनंदात आहे. चित्रपटाच्या सुरूवातीला थोडंसं दडपण आलं होतं मात्र यासगळ्यांबरोबर काम करताना आपण नवीन असल्याची जाणीव त्यांनी कधीही न करून दिल्याचं तिने स्पष्ट केलं.या चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी उत्सुकता ताणून धरत 11 मे ला प्रदर्शित होणाऱ्या रणांगण चित्रपटातून ती स्पष्ट होईल असे प्रणालीने म्हटलं आहे.प्रेक्षकांना संभ्रमात टाकणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती 52 विक्स एंटरटेनमेंट आणि ग्लोबल स्पोर्ट्स एंटरटेनमेंट मिडिया सॉल्यूशन्स (जीसिम्स) आणि हार्वे फिल्म्स यांनी केली आहे.या चित्रपटाचे निर्माते करिष्मा जैन आणि जो राजन आहेत.तर अर्जुन सिंह बर्रन, स्वप्नील जोशी आणि कार्तिक निशानदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे आणि राकेश सारंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

Web Title: Marathi filmmaker got the award for 'Battlefield'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.