"कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार”, राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:12 PM2022-05-11T12:12:44+5:302022-05-11T12:15:04+5:30

केदार शिंदे यांनी राज ठाकरेंसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

Marathi filmmaker Kedar shinde wrote special post for Raj Thackeray | "कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार”, राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

"कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार”, राज ठाकरेंसाठी केदार शिंदेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत

googlenewsNext

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमा घेऊन येत आहेत. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर रिलीज (Maharashtra Shahir Teaser Release ) करण्यात आला. चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक केदार शिंदे यांचं असून पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. अजय- अतुल या जोडीचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. या सिनेमाचा टीझर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित प्रदर्शित करण्यात आला होता. आता केदार शिंदे यांनी राज ठाकरेंसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

केदार शिंदे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट सोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत राज ठाकरे शाहीर साबळे यांच्या पोस्टरकडे अगदी निरखून बघताना दिसतायेत. हा फोटो शेअर करताना केदार शिंदे लिहितात, आपल्या कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार... मनस्वी आनंद.'' केदार शिंदे यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 


‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून या चित्रपटात शाहीर साबळेंची भूमिका कोण साकारणार? याबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात होती. तर आता त्याचंही उत्तर मिळालं आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) शाहीर साबळेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. केदार शिंदे यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली होती.  केदार शिंदे या चित्रपटावर गेली अडीच वर्षं काम करत आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, जेजुरीच्या खंडेराया, या गो दांड्यावरून ही शाहिरांची अजरामर गाणी चित्रपटात असणार आहेत.

Web Title: Marathi filmmaker Kedar shinde wrote special post for Raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.