इफ्फीमध्ये मराठी चित्रपटांची वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2016 02:47 PM2016-11-01T14:47:33+5:302016-11-01T14:48:13+5:30
मराठी चित्रपट हे आशयप्रधान असल्याचे नेहमीच बोलले जाते. आपल्या मराठी चित्रपटांनी अनेक देश-विदेशातील चित्रपट ...
< div style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;"> मराठी चित्रपट हे आशयप्रधान असल्याचे नेहमीच बोलले जाते. आपल्या मराठी चित्रपटांनी अनेक देश-विदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये मोहोर उमटविली आहे. सातासमुद्रापार मराठी सिनेमांचा झेंडा फडकला आहे. आता इफ्फी या नामवंत चित्रपट महोत्सवामध्ये चार मराठी चित्रपटांची वर्णी लागली आहे. नटसम्राट, एक अलबेला, रिंगण आणि सैराट या चित्रपटांची निवड ४७व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल आॅफ इंडियामध्ये करण्यात आली आहे. या चित्रपट महोत्सवामध्ये भारतातील अनेक भाषांमधील चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी असते. मराठी सिनेमाचे पाऊल पुढे पडत असुन या महोत्सवामध्ये आपल्या चार मराठी चित्रपटांची वर्णी लागल्याने चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण आहे. इफ्फी हा नामवंत चित्रपट महोत्सव आहे. हा चित्रपट महोत्सव २० नोव्हेंबर पासुन गोव्यामध्ये सुरु होणार आहे. या महोत्सवासाठी जगभरातील नामवंत व्यक्तींची विशेष उपस्थिती दर वर्षीच असते. नटसम्राट या चित्रपटामध्ये नाना पाटेकर यांनी साकारलेली भूमिका कोणीच विसरु शकणार नाही. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. एक अलबेला या चित्रपटातून विदया बालनने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु मंगेश देसाईचा अभिनय प्रेक्षकांच्या खास लक्षात राहिला होता. रिंगण या चित्रपटावर तर समीक्षक आणि प्रेक्षकांकडुन कौतुकाचा वर्षाव झाला होता. तर सैराट या चित्रपटाने सगळ््यांनाच वेड लावले होते. अनेक भाषांमध्ये या चित्रपटाचा आता रिमेक देखील होत आहे. आता या चारही चित्रपटांना इफ्फीमध्ये किती पसंती मिळते हे आपल्याला लवकरच समजेल.