बॉक्स ऑफिसवर 'दगडीचाळ 2' ची सुसाट कमाई; तब्ब्ल 3 दिवसात गाठला इतक्या कोटींचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 04:02 PM2022-08-22T16:02:22+5:302022-08-22T16:03:21+5:30

Dagdi Chawl 2: हा चित्रपट ३५० हून अधिक स्क्रीनवर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद खरंच थक्क करणारा ठरला आहे.

marathi movie Dagdi Chawl 2 box office collection | बॉक्स ऑफिसवर 'दगडीचाळ 2' ची सुसाट कमाई; तब्ब्ल 3 दिवसात गाठला इतक्या कोटींचा टप्पा

बॉक्स ऑफिसवर 'दगडीचाळ 2' ची सुसाट कमाई; तब्ब्ल 3 दिवसात गाठला इतक्या कोटींचा टप्पा

googlenewsNext

Daagdi Chawl 2:   मुंबई गँगवॉरमधील सर्वात मोठं नाव म्हणजे अरुण गवळी. आजही डॅडींचं नाव घेतलं की अनेकांचा थरकाप उडतो. मुंबईमध्ये जसं डॅडींच्या नावाचा दबदबा आहे. तशीच त्यांची दगडी चाळदेखील प्रसिद्ध आहे. याच दगडीचाळीवर आधारित 'दगडी चाळ ’ (Daagdi Chawl) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर नुकताच दगडी चाळ 2’ (Daagdi Chawl 2) हा चित्रपटही प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट कमाई करताना दिसत आहे.

मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत कणसे यांनी केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेला 'दगडी चाळ २' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजत असून या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत वेग घेतला आहे. सध्या या चित्रपटातील प्रत्येक डायलॉगवर प्रेक्षकांकडून शिट्ट्या, टाळ्या असा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असल्याचं दिसून येतं.

हा चित्रपट ३५० हून अधिक स्क्रीनवर दाखवला जात आहे. प्रेक्षकांचा मिळणारा तुफान प्रतिसाद खरंच थक्क करणारा ठरला आहे. दहीहंडीच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून अवघ्या ३ दिवसात या चित्रपटाने २ कोटी ०५ लाख ३४ हजार ८१४ चा गल्ला जमवला आहे. 

शुक्रवार पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५१ लाख ८२ हजार ७४५ रुपयांची कमाई केली.  तर दुसऱ्या दिवशी ७०लाख ४८ हजार ३७२ रुपयांचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे तिसऱ्या दिवशी चक्क ८३ लाख ०३ हजार ६९७ ची कमाई केली,

दरम्यान, 'शंभो' म्हणत आख्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मकरंद देशपांडे यांचा कमाल अभिनय, सूर्याची भूमिका साकारणारा अंकुश चौधरी तर कलरफुल पूजा सावंतने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांचा आणि समिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर फक्त आणि फक्त 'दगडीचाळ २' चा डंका वाजताना दिसत आहे.
 

Web Title: marathi movie Dagdi Chawl 2 box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.