Exclusive: आधीच्या गौरीला ‘दे धक्का 2’मध्ये घेतलं असतं पण...., महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:59 PM2022-07-22T12:59:34+5:302022-07-29T14:41:58+5:30

De Dhakka 2, Mahesh Manjrekar : 'दे धक्का २'मध्ये गौरी वैद्यला न घेण्यामागचं कारण मांजरेकरांकडून ऐका

marathi movie De Dhakka 2 Mahesh Manjrekar Special Interview | Exclusive: आधीच्या गौरीला ‘दे धक्का 2’मध्ये घेतलं असतं पण...., महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण

Exclusive: आधीच्या गौरीला ‘दे धक्का 2’मध्ये घेतलं असतं पण...., महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण

googlenewsNext

दे धक्का 2’ ( De Dhakka 2) या चित्रपटाची कधीपासून प्रेक्षकांना प्रतीक्षा होती आणि अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपलीय. ‘दे धक्का 2’ हा धम्माल कॉमेडी सिनेमा येत्या 5 ऑगस्टला चित्रपटगृहात धडकणार आहे. या चित्रपटात अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) हेही एका खास भुमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी ‘लोकमत फिल्मी’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याचाच हा सारांश...

14 वर्षांनंतर ‘दे धक्का 2’ येतोय. एवढा उशीर का?
‘दे धक्का’मध्ये जाधव फॅमिलीचा मॅडनेस तुम्ही पाहिला. ‘दे धक्का 2’ सुद्धा असाच धम्माल व्हायला पाहिजे होता. त्या फॅमिलीचा मॅडनेस, त्या फॅमिलीच्या गमतीजमती सगळं येणं गरजेचं होतं. अमेय खोपकरचा फोन आला आणि ‘दे धक्का 2’ची कल्पना प्रत्यक्षात आकारास आली. अतरंगी जाधव कुटुंबाच्या लंडनवारीला एक सक्षम कारण हवं होतं, ते सुद्धा मिळालं, असं मांजरेकर म्हणाले.

लंडनमध्ये शूट म्हटल्यावर कॅप्शन ऑफ शिप म्हणून तुम्ही काय आणि किती दमछाक झाली?
खूप दमछाक व्हायची. फॅमिली मेंबर्स, मग विलेनची गँग... कधी कधी सेटवर 15-15 कलाकार असायचे. माझा गोंधळ व्हायचा. तितकीच मज्जा पण यायची. आपला कुठलाही मराठी कलाकार माज करत नाही. एकदा सेटवर आलेत की सगळं कुटुंब म्हणून काम करतं. त्यामुळे चित्रपट करताना मज्जा आली. भलेही थोडी कसरत व्हायची. पण मज्जा करत सगळं पार पडलं, असं ते म्हणाले.

‘दे धक्का’मध्ये गौरी वैद्य होती. ‘दे धक्का 2’मध्ये आता तुमची गौरी (मांजरेकर यांची मुलगी  गौरी इंगवले) आहे, हे सगळं कसं जुळून आलं?
 ‘दे धक्का’ची गौरी वैद्य खूपच चांगली डान्सर होती, उत्तम कलाकार होती. पण आता तिने वेगळीच फिल्ड पकडलीये. ती  इंजिनिअरिंगला गेली. तिला ‘दे धक्का 2’मध्ये घेतलं असतं तर कुणी विश्वास ठेवला नसता, की ही ती आहे. सक्षम तरी ओळखू येतो. मग काय करायचं तर? आमची गौरी मला सापडली. ती सुद्धा चांगला डान्स करते, असं मांजरेकर म्हणाले.

‘दे धक्का 2’ हा सिनेमा 14 वर्षांनंतर येतोय. काय भावना आहेत?
‘दे धक्का’ इतकाच ‘दे धक्का 2’ भन्नाट आहे. यातून आम्हाला काहीही तत्त्वज्ञान सांगायचं नाहीये. हा सिनेमा म्हणजे पूर्णपणे एंटरटेनमेंट आहे, असं मांजरेकर म्हणाले.

Web Title: marathi movie De Dhakka 2 Mahesh Manjrekar Special Interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.