दोन प्रेमवीरांची कथा सांगणारा ‘फतवा’ रुपेरी पडद्यावर, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 04:07 PM2022-12-10T16:07:06+5:302022-12-10T16:10:48+5:30

‘फतवा’ हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Marathi movie Fatwa released on December 9 in theater | दोन प्रेमवीरांची कथा सांगणारा ‘फतवा’ रुपेरी पडद्यावर, जाणून घ्या याविषयी

दोन प्रेमवीरांची कथा सांगणारा ‘फतवा’ रुपेरी पडद्यावर, जाणून घ्या याविषयी

googlenewsNext

वेगवेगळ्या कथाविषयांच्या चित्रपटांमुळे आणि हटके जोड्यांमुळे अनेक मराठी चित्रपट सध्या लक्षवेधी ठरतायेत. गोष्टी नामंजूर असल्या की त्याविरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. फतव्याच्या वेगवेगळया बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. पण आता ‘फतवा’ हे शीर्षक असणारा मराठी चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  प्रतिक गौतम आणि श्रद्धा भगत ही नवी जोडी ‘फतवा’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडदयावर आली आहे. या दोघांसोबत छाया कदम, मिलिंद शिंदे, नागेश भोसले, संजय खापरे,अमोल चौधरी, निलेश वैरागर, पूनम कांबळे, निखिल निकाळजे, निकिता संजय हे कलाकार ‘फतवा’मध्ये दिसणार आहेत. डॉ.यशवंत, प्रेमा निकाळजे, अनुराधा पवार यांनी या चित्रपटाची निर्मीती केली आहे.

प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो. कुणाला त्याचे चटकेही बसलेले असतात. ‘फ़तवा’ चित्रपटातून प्रेमाचा वेगळा पैलू उलगडणार असून हा चित्रपट प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमला आहे.  

वेगवेगळ्या ढंगातील सहा गाणी या चित्रपटात आहेत. बाबा चव्हाण यांनी लिहिलेली आणि संगीतबद्ध कलेली ‘अलगद मन’, ‘प्रेमाचा गोंधळ’ ही दोन गाणी चित्रपटात असून ‘अलगद मन’ हे मनस्पर्शी गीत गायिका पल्लक मुच्चल यांनी गायलं आहे. तर ‘प्रेमाचा गोंधळ’ हे रांगडेबाज गीत गायक नंदेश उमप यांच्या पहाडी आणि दमदार आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. गीतकार डॉ.विनायक पवार यांच्या लेखनीतून उतरलेलं ‘चोरून चोरून’, ‘सजनी दोघं एक होऊ’ या प्रेमगीतांना अभय जोधपूरकर वेदा नेरुरकर यांचे मधुर स्वर लाभले असून संजीव–दर्शन यांनी या गीतांना संगीत दिले आहे. गीतकार अमोल देशमुख यांनी गीतबद्ध केलेलं ‘पुन्हा पुन्हा’ या भावप्रधान गाण्याला पद्मश्री सोनू निगम यांनी आवाज दिला आहे. प्रतीक गौतम,प्रवीण पगारे,सिद्धार्थ पवार यांचे संगीत या गाण्याला लाभले आहे. आराफत मेहमूद यांनी गीत-संगीतबद्ध केलेलं ‘अली मौला’ ही कव्वाली साबरी ब्रदर्स यांनी गायली आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे.
 

Web Title: Marathi movie Fatwa released on December 9 in theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.