बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा 2' देतोय टक्कर; दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर राखला गड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 02:55 PM2023-12-08T14:55:09+5:302023-12-08T14:56:04+5:30

Jhimma 2: animal सारखा तगडा सिनेमा असूनही झिम्मा 2 ने त्यांचा गड चांगलाच राखला आहे. सिनेमाचं हे यश पाहून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

marathi movie Jhimma 2 box-office-vs- ranbir kapoor movie animal  | बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा 2' देतोय टक्कर; दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर राखला गड

बॉलिवूड सिनेमांना 'झिम्मा 2' देतोय टक्कर; दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर राखला गड

सध्या कलाविश्वात अनेक दर्जेदार सिनेमाची निर्मिती होताना दिसत आहे. यात अलिकडेच 'झिम्मा 2', 'Animal' आणि 'सॅम बहादूर' असे हिंदी-मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यामुळे सध्या प्रेक्षकांना पर्वणीच मिळाली आहे. विशेष म्हणजे या सगळ्यांमध्ये animal हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवताना दिसत आहे. तर, दुसरीकडे 'झिम्मा 2' हा मराठी सिनेमाही त्याला टक्कर देताना दिसत आहे.  'झिम्मा 2' रिलीज झाल्यापासून सलग दोन आठवडे या सिनेमाने हाऊस फूल शो दिले आहेत.

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' हा सिनेमा सलग २ आठवड्यांपासून सिनेमागृहांमध्ये गाजत आहे. विशेष म्हणजे या सिनेमासमोर animal सारखा तगडा सिनेमा असूनही झिम्मा 2 ने त्यांचा गड चांगलाच राखला आहे. सिनेमाचं हे यश पाहून दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनेही त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला हेमंत ढोमे?

'' खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असं खरोखर वाटलं नाही. प्रेक्षक आपले खास दिवस 'झिम्मा २'बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर 'झिम्मा २'ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण 'झिम्मा'ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते, असं हेमंत म्हणाला.

'उपेंद्र लिमये सोशल मीडियावर का नाही?' अभिनेत्याने पहिल्यांदाच जाहीरपणे सांगितलं कारण

पुढे तो म्हणतो, ''झिम्मा २' सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही 'झिम्मा २'ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत 'झिम्मा २' स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वीरित्या दुसऱ्या आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहे. शोजही वाढले  आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.''
 

Web Title: marathi movie Jhimma 2 box-office-vs- ranbir kapoor movie animal 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.