Kedar Shinde : शेवटपर्यंत राहिला हा पायपीट करत केलेला प्रवास..., दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:26 PM2022-05-19T12:26:30+5:302022-05-19T12:28:49+5:30

Kedaar Shinde Post : लवकरच केदार शिंदे यांचा  ‘महाराष्ट्र शाहीर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहीर साबळे यांच्यावर जीवनावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय त्यांची एक ताजी पोस्टही तुफान व्हायरल होतेय.

marathi movie maharshtra shaheer director Kedar Shinde post viral | Kedar Shinde : शेवटपर्यंत राहिला हा पायपीट करत केलेला प्रवास..., दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल

Kedar Shinde : शेवटपर्यंत राहिला हा पायपीट करत केलेला प्रवास..., दिग्दर्शक केदार शिंदेंची पोस्ट व्हायरल

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज लेखक-दिग्दर्शक म्हणून केदार शिंदे   (Kedar Shinde)  यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्यांचं काम उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. लवकरच त्यांचा  ‘महाराष्ट्र शाहीर’  (Maharashtra Shaheer) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.   शाहीर साबळे यांच्यावर जीवनावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. शिवाय त्यांची एक ताजी पोस्टही तुफान व्हायरल होतेय. होय, ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने शाहीर साबळे यांच्या लेकीनं लिहिलेली पोस्ट केदार शिंदे यांनी शेअर केली आहे. शाहीर साबळे यांचा अख्खा जीवनपट या पोस्टमध्ये आहे.
 
वाचा, केदार शिंदे यांनी शेअर केलेली पोस्ट

 

प्रवास
काळ कीती झपाट्याने बदलत जातो नाही! एक काळ होता अगदी स्वातंत्र्य मीळाल्या नंतर लगेचचा..अजुन गावोगावी धड रस्ते झाले नव्हते, प्रवासाची साधनं खेड्यापाड्यात पोचली नव्हती आणि मुळात म्हणजे वीज अजुनही शहरी भागांनाच दिपवत होती तो काळ..शाहीर साबळे म्हणजे आमचे बाबा तोवर खेड्यापाड्यातच कार्यक्रम करत असत..कधी दहा,बारा कोसाच अंतर असे तर कधी पंधरा,वीस कोसाचही मग धुळभरल्या रस्त्यावरचा वाद्य डोक्यावर,हाता,खांद्यावर अडकवून कीत्येक कोसांचा पायी प्रवास सुरु व्हायचा..
कीत्येक ठीकाणी कार्यक्रमानंतर मीळणारं जेवण हीच बीदागी असायची पण तरुण वय होत त्यामुळे काही करुन दाखवायची मनात जीद्द होती..कधी रस्ता चुकला तर चार,पाच कोस अजुन पायपीट व्हायची..
पण कष्ट केले की दिवस पलटतातच..लवकरच शाहीरांनी मुंबईत बस्तान बसवल आणि एक सेकंडहँण्ड गाडी वीकत घेतली..मधे मधे बंद पडणारी,धक्का द्यावा लागणारी..खर तर शाहीर उत्तम ड्रायव्हर होते ते ड्रायव्हींग कसे शीकले हा संशोधनाचा विषय आहे पण तरीही त्यांनी गाडीवर मुणगेकर नावाचे ड्रायव्हर ठेवले होते...पुढे आयुष्यात त्यांनी बर्याच नव्याकोर्या गाड्या घेतल्या...जीप हा त्यांचा गाड्यांमधला आवडता प्रकार..बरीच वर्ष त्यांनी जीपमधून सर्व कलावंतासह महाराष्ट्र पींजून काढला..पुढे नवीकोरी चेसी घेऊन त्यावर पस्तीस सीटर आरामबस पण बनवून घेतली...त्यानंतर लोकधारा करताना नव्या २४ सीटर गाडीतून ४० कलावंत बसवून परत महाराष्ट्रभर फीरले..पण तरीही त्यांच्या आठवणीत शेवटपर्यंत राहीला हा पायपीट करत केलेला प्रवास...त्यावेळी हातावर भाकरी घेऊन केलेल जेवण, पाटाच्या पाण्यात धुळीने माखलेले हातपाय धूण आणि सतत गाऊन बसलेला आवाज सुटण्यासाठी जेष्ठमध,कंकोळ वगैरे औषध घेण्यासाठी त्यांच्या राजेंद्र बावीसकर या सुशिक्षीत मीत्राने प्रेक्षकांसमोर पैशासाठी पसरलेला हात... 

Web Title: marathi movie maharshtra shaheer director Kedar Shinde post viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.