'श्री स्वामी समर्थ' स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावर,या कलाकरांच्या असणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 02:59 PM2018-10-19T14:59:48+5:302018-10-19T15:01:22+5:30

स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लवकरच एक घेऊन येत आहे. 'श्री स्वामी समर्थ' असे या सिनेमाचे शिर्षक असून, खास दसऱ्याच्या मुहूर्तावर याची अधिकृत घोषणा करण्यात आली.

Marathi Movie On Swami Samarth will soon be on the big screen, the role of these artists | 'श्री स्वामी समर्थ' स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावर,या कलाकरांच्या असणार भूमिका

'श्री स्वामी समर्थ' स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावर,या कलाकरांच्या असणार भूमिका

googlenewsNext

'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..' हे वाक्य नुसते उच्चारले तरी लगेच स्वामी समर्थांचे रुप नजरेसमोर दिसू लागते. मनाला धीर देणारे त्यांचे हे वाक्य जगण्याला नवी उर्जा मिळवून देते. स्वामींच्या दर्शनाने मनातील खंत, नाराजी आणि दुःख सारी कमी होत असल्यामुळे, स्वामींचा अगाध महिमा लवकरच मोठ्या पडद्यावरदेखील आपल्याला पाहता येणार आहे. कारण, स्वामी समर्थांच्या जीवनावर आधारित मराठी सिनेमा दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लवकरच एक घेऊन येत आहे. 'श्री स्वामी समर्थ' असे या सिनेमाचे शिर्षक असून, खास दसऱ्याच्या मुहूर्तावर याची अधिकृत घोषणा करण्यात आली. दादरच्या प्रसिद्ध स्वामी समर्थांच्या मठात दसऱ्याच्या दिवशी पार पडलेल्या या छोटेखानी कार्यक्रमात मराठी सिनेसृष्टीतले स्वामीभक्त कलाकार अंकुश चौधरी, सतीश पुळेकर आणि किशोरी अंबिये यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती.

पर्व क्रिएशन्स निर्मिती 'श्री स्वामी समर्थ' या सिनेमाचे लिखाण दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनीच केले असून, या सिनेमातील स्वामी समर्थांच्या भूमिकेविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकतेचे वातावरण आहे. त्यामुळे, स्वामींच्या महत्वपूर्ण व्यक्तिरेखेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ऑडीशन घेतली जाणार असल्याचे कळते. शिवाय या सिनेमात मराठीतील दिग्गज कलाकारांचीदेखील भूमिका असणार आहे.
 

Web Title: Marathi Movie On Swami Samarth will soon be on the big screen, the role of these artists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.