TDM Official Trailer : अस्सल गावरान....! भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 02:36 PM2023-04-13T14:36:02+5:302023-04-13T14:37:23+5:30

TDM Official Trailer : ख्वाडा आणि बबन या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade)  'TDM’ नावाचा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला.

Marathi Movie TDM Official Trailer Pruthviraj Thorat Kalindi Bhaurao Karhade | TDM Official Trailer : अस्सल गावरान....! भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

TDM Official Trailer : अस्सल गावरान....! भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

googlenewsNext

TDM Official Trailer : ख्वाडा आणि बबन या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade)  'TDM’ नावाचा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. 'टीडीएम’च्या गाण्यांची आधीच धुमाकूळ घातला आहे.  चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं  प्रेमीयुगुलांच्या दिलाचा ठोका चुकवत आहे. यानंतर रिलीज झालेलं 'मनं झालं मल्हारी’ हे गाणंही तुफान लोकप्रिय ठरलं आहे. आता या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

'टीडीएम' चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज थोरात आणि अभिनेत्री कालिंदी निस्ताने यांची अस्सल प्रेमकथा, त्यांचं अस्सल गावरान ठसकेबाज संवाद आणि सोबतीला रांगड्या पृथ्वीचा ॲक्शन अवतार असं सगळं काही या ट्रेलरमध्ये आहे. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय. रिलीज होताच या ट्रेलरवर चाहत्यांच्या उड्या पडताहेत. लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय. रिलीज होताच ट्रेलर युट्युबवर ट्रेंड करतोय.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी आजही लोकांना भुरळ पाडतायत. यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाण्यांचीही भर पडली आहे. २८ एप्रिल २०२३ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

Web Title: Marathi Movie TDM Official Trailer Pruthviraj Thorat Kalindi Bhaurao Karhade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.