उद्या सिनेमाची रिलीज डेट अन् आज...मराठी दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2023 11:57 IST2023-05-04T11:51:55+5:302023-05-04T11:57:03+5:30
लेखक दिग्दर्शक म्हणून त्यांचा पहिलाच सिनेमा होता.

उद्या सिनेमाची रिलीज डेट अन् आज...मराठी दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचं निधन
'मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे आज निधन झाले. पहाटे चेंबूरच्या घाटलागाव परिसरात राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले काही महिने ते आजारी होते. 'मराठी पाऊल पडते पुढे' हा त्याचा लेखक-दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा होता. हा चित्रपट उद्या रिलीज होणार असतानाच, आज त्यांच्यावर काळाने घाला घातला.
मराठी तरूणांना उद्योजक बनवण्याचे धाडस देणारा हा चित्रपट त्यांनी तयार केला होता. या चित्रपटाचा शंभर टक्के निव्वळ नफा संपूर्णपणे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मार्गदर्शन आणि मदत, वृद्धाश्रमांना मदत करण्यासाठी आणि दहा टक्के नफा चित्रपट कलाकारांना दिला जाणार आहे. हा चित्रपट उद्या ५ मे रोजी प्रदर्शित होत असताना आज चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांचे निधन झाले, अशी माहिती चित्रपट निर्माते प्रकाश बाविस्कर यांनी दिली.