'चार अमराठी लोकांमध्ये...'; भरत जाधवची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 05:54 PM2022-02-28T17:54:04+5:302022-02-28T17:55:03+5:30

Bharat jadhav: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भरत जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मराठीचं कौतुक करण्यासोबतच मराठी भाषा कशी वृद्धिंगत होईल हे सांगायचा प्रयत्न केला आहे.

marathi rajbhasha din 2022 bharat jadhav special post | 'चार अमराठी लोकांमध्ये...'; भरत जाधवची 'ती' पोस्ट चर्चेत

'चार अमराठी लोकांमध्ये...'; भरत जाधवची 'ती' पोस्ट चर्चेत

googlenewsNext

 ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. या दिनाचं निमित्त साधत काल सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने एकमेकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यात अभिनेता भरत जाधव याची पोस्ट चर्चेत आली आहे. अमराठी लोकांना मराठीची गोडी केव्हा लागेल हे त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भरत जाधवने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने मराठीचं कौतुक करण्यासोबतच मराठी भाषा कशी वृद्धिंगत होईल हे सांगायचा प्रयत्न केला आहे.

लता मंगेशकर यांच्यासोबत झळकलेल्या 'या' फोटोमध्ये आहेत मराठी कलाकार; तुम्ही किती जणांना ओळखलं?

"आपलं मराठीपणं, त्यातला गोडवा आणि कडवटपणा आपल्या रोजच्या जगण्यात दिसायला हवा तरच चार अमराठी लोकांमध्ये अगदी मनापासून मराठी भाषा शिकायची, बोलायची अन वाचायची जिज्ञासा निर्माण होईल..!#मराठीभाषागौरवदिन #भरतजाधव..", असं कॅप्शन देत भरत जाधवने मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, विनोदाचं उत्तम टाइमिंग, सुंदर आणि सहज अभिनयशैली यामुळे भरत जाधव कायम चर्चेत असतो. आज भरत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून भरत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

Web Title: marathi rajbhasha din 2022 bharat jadhav special post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.