कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 07:08 PM2022-08-18T19:08:02+5:302022-08-18T19:10:28+5:30

Kartiki gaikwad: दोन वर्षांपूर्वी कार्तिकीने रोनित पिसे याच्यासोबत ग्रँड वेडिंग केलं. या लग्नसोहळ्याची मराठी कलाविश्वात बरीच चर्चा रंगली होती.

marathi singer kartiki gaikwad share romantic video with husband ronit pise | कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ

कार्तिकी- रोनितचा फिल्मी अंदाज; थायलंडमध्ये शूट केला रोमॅण्टिक व्हिडीओ

googlenewsNext

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड (Kartiki gaikwad). वडिलांकडून संगीताचा वारसा मिळालेली कार्तिकी आज मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. आजवर अनेक चित्रपट, मालिकांसाठी कार्तिकीने पार्श्वगायन केलं आहे. कार्तिकी कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही सक्रीय आहे. त्यामुळे वरचेवर तिच्याविषय़ीचे अपडेट चाहत्यांना देत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा आणि तिच्या नवऱ्याचा एक फिल्मी स्टाइल व्हिडीओ व्हायरल होत आहे.

दोन वर्षांपूर्वी कार्तिकीने रोनित पिसे याच्यासोबत ग्रँड वेडिंग केलं. या लग्नसोहळ्याची मराठी कलाविश्वात बरीच चर्चा रंगली होती. लग्नानंतर कार्तिकी तिच्या सासरच्या मंडळींसोबत आणि खासकरुन रोनितसोबतचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.

अलिकडेच कार्तिकी आणि रोनित थायलंडला व्हेकेशन एन्जॉय करायला गेले होते. येथील अनेक व्हिडीओ, फोटो कार्तिकीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यातील या दोघांचा एक रोमॅण्टिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघंही फिल्मी स्टाइलमध्ये दिसून येत आहेत. लहान लहान व्हिडीओ एकत्र करुन हा एक व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. कार्तिकीने डिसेंबर 2020 मध्ये रोनित पिसे सोबत लग्न केले. तेव्हापासून या जोडीची सोशल मीडियावर चर्चा रंगत असल्याचं पाहायला मिळतं.
 

Web Title: marathi singer kartiki gaikwad share romantic video with husband ronit pise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.