Video : मराठमोळ्या गायिकेने गायलेलं 'राम सिया राम' ऐकलं का? अंगावर रोमांच येईल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 07:15 PM2024-01-18T19:15:53+5:302024-01-18T19:16:13+5:30
'राम सिया राम', मराठी गायिकेच्या आवाजातलं रामाचं गीत ऐकून रोमांचित व्हाल
सध्या सगळीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची धामधूम सुरू आहे. येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. अनेक सेलिब्रिटीही या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. संपूर्ण देशात राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
अनेक सेलिब्रिटी राम मंदिर सोहळ्यासाठी खास पोस्टही शेअर करत आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठमोळी गायिका प्रियांका बर्वे हिने तिच्या सुमधूर आवाजात राम सिया राम हे गीत रेकॉर्ड केलं आहे. याची छोटी झलक तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केली आहे. दूरदर्शनवरील एका कार्यक्रमासाठी प्रियांकाने हे गीत गायलं. 'चौपाई का स्वर राम की गाथा' या कार्यक्रमात कहानी घर घर की फेम अभिनेत्री साक्षी तनवरही सहभागी झाली होती. प्रियांकाने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
२२ जानेवारी २०२४ ला अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा दिवस देशात दिवाळी सारखा साजरा करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.