राहुल देशपांडेच्या मुलीचा आहे सोशल मीडियावर बोलबाला, तिला पाहून तैमुरला देखील विसराल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 17:06 IST2020-04-10T14:38:23+5:302020-04-11T17:06:05+5:30

या मुलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सध्या तिचीच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

marathi singer rahul deshpande's daughter got famous on social media | राहुल देशपांडेच्या मुलीचा आहे सोशल मीडियावर बोलबाला, तिला पाहून तैमुरला देखील विसराल

राहुल देशपांडेच्या मुलीचा आहे सोशल मीडियावर बोलबाला, तिला पाहून तैमुरला देखील विसराल

ठळक मुद्देरेणूचे विविध व्हिडिओ आपल्याला राहुल देशपांडे यांच्या फेसबुकच्या पेजवर पाहायला मिळतात. तिने नुकताच सय्या मेरा... हे गाणे गात एक क्यूट व्हिडिओ बनवला आहे.

बॉलिवूडमधील सेलिब्रेटी जितके फेमस आहेत, तितकेच त्यांची मुलं देखील प्रसिद्ध आहेत. तैमुर तर स्टार किडमधील सगळ्यात जास्त फेमस असलेला स्टार किड आहे. सोशल मीडियावर आपल्याला त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ पाहायला मिळतात. पण आता तैमुरपेक्षाही एका मराठी कलाकाराची मुलगी सोशल मीडियावर चांगलीच फेमस झाली आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सध्या तिचीच सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची मुलगी सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. तिचा नुकताच वाढदिवस झाला असून तिचे नाव रेणूका आहे. तिचे विविध व्हिडिओ आपल्याला राहुल देशपांडे यांच्या फेसबुकच्या पेजवर पाहायला मिळतात. तिने नुकताच सय्या मेरा... हे गाणे गात एक क्यूट व्हिडिओ बनवला आहे. 

सध्या जगभर कोरानाने थैमान घातले आहे. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. भारतात देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला असल्याने सगळेच लोक आपापल्या घरातच कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे लोकांशी संपर्क साधत आहेत. तसेच विविध व्हिडिओ त्यांच्या फॅन्ससाठी शेअर करत आहेत. गायक राहुल देशपांडे देखील त्यांच्या गायनाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत असून काही व्हिडिओमध्ये आपल्याला त्यांच्या चिमुकलीला देखील पाहायला मिळत आहे. या चिमुकलीचा व्हिडिओंमधील अंदाज राहुल यांच्या फॅन्सना प्रचंड आवडत असून तुमची मुलगी खूपच गोड असल्याचे लोक त्यांना कमेंटद्वारे सांगत आहेत.

राहुल यांच्या मुलीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून काही व्हिडिओ तर लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहेत तर हजाराहून अधिक लोकांनी ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या कोणत्याही स्टार किड पेक्षा राहुल देशपांडे यांच्या मुलीचा सोशल मीडियावर बोलबाला आहे असेच आपल्याला म्हणावे लागेल.      

 

Web Title: marathi singer rahul deshpande's daughter got famous on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.