पहचान कौन? गाल फुगवून बसलेला फोटोतील हा चिमुरडा आहे मराठीतला दिग्गज स्टार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 17:55 IST2022-03-24T17:51:22+5:302022-03-24T17:55:20+5:30
Throwback : या ब्लॅक अॅण्ड व्हाईस फोटोतील गाल फुगवून बसलेला तो चिमुकला दिसतोय ना? हा चिमुकला आज मराठी इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेता आहे. तुम्ही त्याला ओळखलंत?

पहचान कौन? गाल फुगवून बसलेला फोटोतील हा चिमुरडा आहे मराठीतला दिग्गज स्टार
Throwback : आपल्या आवडत्या कलाकारांचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे बालपणीचे फोटो पाहण्याची मज्जाच वेगळी. सध्या एक फोटो असाच तुफान व्हायरल होतोय. होय, नाटक, मालिका, चित्रपट , वेब मालिका अशा चारही माध्यमात लीलया वावरणारा मराठीतील एक दिग्गज अभिनेत्याचा हा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. या ब्लॅक अॅण्ड व्हाईस फोटोतील गाल फुगवून बसलेला तो चिमुकला दिसतोय ना? हा चिमुकला आज मराठी इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेता आहे. तुम्ही त्याला ओळखलंत?
एका बाजूला गळ्यात ढोलकी अडकवलेला मुलगा तर दुसऱ्या बाजूला एक मुलगी आणि मध्ये कोण तर गाल फुगवलेला मुलगा. अद्यापही तुम्ही त्याला ओळखू शकला नसाल तर आम्ही सांगतो. त्या मुलाचं नाव आहे, चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar).
होय, चिन्मयची पत्नी नेहा जोशी मांडलेकर हिने नवऱ्याचा हा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. ‘कोण आहे बरं हा मुलगा आणि असे गाल फुगवून का बरं बसला आहे’,असं गोड कॅप्शन देत तिने हा गोड फोटो शेअर केला आहे. सध्या हा फोटो चांगलाच चर्चेत आहे.
चिन्मयची पत्नी नेहा जोशी मांडलेकर फोटोग्राफर असून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी मध्ये ती कार्यरत आहे. चिन्मयला तर आपण सगळेच ओळखतो.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या बिट्टाच्या भूमिकेचं जबरदस्त कौतुक होतंय. त्याआधी ‘पावनखिंड’ हा त्याचा चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात त्याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका चाहत्यांनी अशीच डोक्यावर घेतली. लवकरच चिन्मय ‘शेर शिवराज’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटातही तो शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.