मराठी पाऊल पडते पुढे..! मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 02:48 PM2020-11-28T14:48:07+5:302020-11-28T14:48:41+5:30

आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहीर झाला आहे.

Marathi steps forward ..! Marathi director Akshay Indikar receives prestigious award in Asia | मराठी पाऊल पडते पुढे..! मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

मराठी पाऊल पडते पुढे..! मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना आशिया खंडातला प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

googlenewsNext

आशिया खंडाचा अकॅडमी अवॉर्ड अशी ओळख असलेला ‘यंग सिनेमा अवॉर्ड’ हा पुरस्कार यंदा मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर यांना जाहीर झाला आहे. फिल्म जगतातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. अक्षय इंडीकर यांची ‘स्थलपुराण’ या चित्रपटातील विशेष दिग्दर्शकीय कामगिरी लक्षात घेता त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. 


अक्षय इंडीकर यांनी आनंद व्यक्त करत इंस्टाग्राम सांगितले की, मला सांगायला अतिशय आनंद होतोय आणि मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की 
आशिया खंडातील सर्वोच्च असा एशिया पॅसिफिक यंग सिनेमा अवॉर्ड हा पुरस्कार एशियन सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जातो. सत्तर देशातून एका फिल्ममेकरला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. आशियाचे ऑस्कर असा मानला जाणारा हा पुरस्कार ऑस्ट्रेलिया येथील ग्रीफिथ फिल्म स्कुल, युनिस्को आणि आशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी यांच्या वतीने दिला जातो आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे यांची मानद मेंबरशिप सुद्धा मला प्राप्त झाली आहे.

आशिया पॅसिफिक विभागातील सुमारे ७० देशांमधून या पुरस्कारासाठी एकाची निवड केली जाते. आजतायगत सुमारे ३००० सिनेमे या पुरस्काराच्या स्पर्धेत उतरले आहेत. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी अक्षय इंडीकर यांना मिळालेला हा बहुमान ही आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

‘उदाहरणार्थ नेमाडे’ या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटापासून अक्षय इंडीकर यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ नेमाडेनंतर ‘त्रिज्या’ व ‘स्थलपुराण’ हे त्यांचे चित्रपट जगभारतल्या अत्यंत प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आले आहेत. स्थलपुराण हा चित्रपच बर्लिन अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘जनरेशन कॉम्पिटिशन’ या विभागात प्रदर्शित झाला होता. या व्यतिरिक्त अतिशय मानाच्या अशा क्रिस्टल पुरस्कारासाठी त्यांना नामांकनही मिळाले होते.

Web Title: Marathi steps forward ..! Marathi director Akshay Indikar receives prestigious award in Asia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.