अरे वा! अशोक सराफ यांनी सुरू केलं इन्स्टाग्राम अकाऊंट, तुम्ही केलं का फॉलो?
By कोमल खांबे | Updated: March 18, 2025 11:20 IST2025-03-18T11:08:54+5:302025-03-18T11:20:28+5:30
प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा आणि कॉमेडीचा बादशहा आता इन्स्टाग्रामवर आले आहेत.

अरे वा! अशोक सराफ यांनी सुरू केलं इन्स्टाग्राम अकाऊंट, तुम्ही केलं का फॉलो?
मराठीतील सुपरस्टार आणि कॉमेडीचा बादशहा ज्यांनी अभिनय आणि विनोदीशैलीने ८०-९०चा काळ गाजवला ते म्हणजे अशोक सराफ. गेली कित्येक दशकं ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आज ७७व्या वर्षीही ते चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. मग सिनेमा असो नाटक किंवा मालिका...अशोक सराफ आजही तितक्याच स्फुर्तीने आणि उत्साहाने काम करताना दिसतात. प्रेक्षकांचे लाडके अशोक मामा आणि कॉमेडीचा बादशहा आता इन्स्टाग्रामवर आले आहेत.
अशोक सराफ यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर त्यांचं स्वत:चं ऑफिशियल अकाऊंट सुरू केलं आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी ही माहिती चाहत्यांना दिली आहे. अशोक सराफ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ashoksaraf_official असं त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नाव आहे. याशिवाय 'अशी ही जमवा जमवी' या त्यांच्या नव्या सिनेमाचा टीझरही त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी अशोक सराफ यांना इन्स्टाग्रामवर फॉलो केलं आहे.
'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', 'धुमधडाका', 'माझा पती करोडपती', 'साडे माडे तीन', 'फेका फेकी', 'नवरा माझा नवसाचा' या सिनेमांमध्ये अशोक सराफ कॉमेडी भूमिकांमध्ये दिसले. याशिवाय अनेक सिनेमांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. 'चौकट राजा', 'शेंटीमेंटल', 'आयत्या घरात घरोबा', 'एक डाव भुताचा', 'पांडू हवालदार', 'वेड' या सिनेमांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. मराठीबरोबरच त्यांनी हिंदी मालिका आणि सिनेमांमध्येही अभिनयाची छाप पाडली. 'हम पांच' ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. सध्या ते 'अशोक मा.मा.' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.