"लग्न म्हणजे जबाबदारी, ओझं आणि...", सई ताम्हणकरने लग्नाबद्दल सांगितलं बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 12:30 PM2024-01-31T12:30:21+5:302024-01-31T12:30:45+5:30
Saie Tamhankar : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे. लवकरच ती श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात दिसणार आहे.
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे. लवकरच ती श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान आता तिने लोकमतच्या नो फिल्टर शोमध्ये तिने लग्नासंस्थेबद्दलचं तिचं मत व्यक्त केले.
सई ताम्हणकरने म्हटले की, लग्न हा व्यक्तिनिष्ठ विषय आहे. मी खूप लोक अशी पाहिली आहेत जे नवरा बायकोंसोबत वेगळी असतात. मित्रांसोबत वेगळे असतात. मला असं वाटतं अशा रिलेशनशीपला काही अर्थ नाही. एकमेकांच्या जगाला प्राधान्य देऊन एकत्र आले पाहिजे. ती व्यक्ती माझ्या आयुष्यात येण्याआधी माझे एक जग होते. तसेच मी त्या व्यक्तीच्या आयुष्यात येण्याआधी त्याचं वेगळं जग होतं. ते जग तसंच राहिलं पाहिजे. त्याचा आदर करत दोन व्यक्ती एकत्र आले पाहिजेत. मला अशी कुणीतरी व्यक्ती हवी आहे जी कळून सुद्धा उरेल.
सई पुढे म्हणते की, लग्न ही संस्था आहे, जी पिढ्यानं पिढ्या चालत आली आहे. त्यात तथ्य आहे. त्याचा आदर करणे महत्त्वाचं आहे. नवीन पिढीचे लग्नाबद्दलचे विचार वेगळे असतील. लग्न ओझं, जबाबदारी किंवा करायलाच लागतं असा विचार करून करू नये असं मला वाटतं. लव्ह मॅरिज, अरेंज मॅरिजने फार काही फरक पडतो असे मला वाटत नाही. कारण आज ना उद्या ती व्यक्ती आपल्याला कळते. 'शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो न खाए वो भी पछताए' ही म्हण खरी आहे. या म्हणी लॉजिकने स्टडी करून बनल्या असतील. लग्न हा खूप उत्सुकतेचा आणि गुढने भरलेला आहे.