प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात १५ लघुपटांमध्ये चुरशीचा सामना!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 08:17 PM2022-01-12T20:17:53+5:302022-01-12T20:18:22+5:30

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव १४ जानेवारी रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर येथे पुरस्कार वितरण रंगणार आहे.

matches in 15 short films at Prabodhan International Short Film Festival! | प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात १५ लघुपटांमध्ये चुरशीचा सामना!

प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात १५ लघुपटांमध्ये चुरशीचा सामना!

googlenewsNext

१९७२ साली स्थापना झालेल्या आणि मुंबई व महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, खेळ आदी क्षेत्रात जाणीवतेने कार्य करणार्‍या 'प्रबोधन गोरेगाव' संस्थेद्वारे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रबोधन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्राचे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शखाली करण्यात येत आहे.

लघुपट करणार्‍या व करू इच्छिणार्‍या जगभरातील मराठी कलावंतांसाठी एक भरभक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन लघुपटांच्या निर्मितीसोबत त्यांचे मार्केटिंग आणि विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत सहभाग घेण्यातील मार्गदर्शनही देण्यात येणार आहे. प्रख्यात जागतिक कीर्तीचे चित्रपट समीक्षक, अभ्यासक व दिग्दर्शक अशोक राणे हे या ‘महोत्सव संचालक’ म्हणून कार्यभार पहात आहेत तर मंगेश मर्ढेकर यांनी या महोत्सवाच्या ‘कार्यक्रम संचालक’पदी योगदान दिले आहे.
महोत्सवाचे आयोजन शुक्रवार दि. १४ जानेवारी २०२२ रोजी पु. ल. देश्पांडे कला अकादमी, दादर, मुंबई येथे या वेळेत संपन्न होणार असून या सोहळ्यास लोकप्रिय अभिनेते संदीप कुलकर्णी  प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्यासोबतच  चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या ५२व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक स्पर्धा विभागात पुरस्कार मिळविणार्‍या गोदावरी या मराठी चित्रपटाचे अभिनेते जितेंद्र जोशी व दिग्दर्शक निखिल महाजन यांचा विशेष सन्मान व गौरव या समारंभात करण्यात येण्यात आहे. महोत्सवाचा समारोप समारंभ सायंकाळी ५ : ३० वा. ते ६ : ३० वा. या वेळेत संपन्न होणार असून केवळ निमंत्रितासाठी प्रवेश दिला जाणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना हा समारंभ संस्थेच्या अधिकृत https://www.facebook.com/prabodhanisff या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे.वया महोत्सवासाठी ७० हून अधिक मराठी लघुपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. त्यामधून निवड समितीने दक्षतेने १५ लघुपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे.
 
अधिकृत निवड झालेले चित्रपट:
१. अंकुर / दिग्दर्शक: महादेव आनंदराव धुलधर / २७ मि. ३७ से.
२. अर्जुन / दिग्दर्शक: शिवराज वाईचळ / १४ मि. ४५ से.
३. बटर चिकन / दिग्दर्शक: मयुरेश वेंगुर्लेकर / १८ मि. १४ से.
४. फक्त १४४ / दिग्दर्शक: अशोक यादव / १२ मि. ५५ से.
५. खिसा / दिग्दर्शक: राज मोरे / १५ मि. ५६ से.
६. लगाम / दिग्दर्शक: मदन काळे / २० मि.
७. लाल / दिग्दर्शक: सुमीत पाटिल / २६ मि. ३३ से.
८. वन्स ही डिड अ टीनएज पेंटिंग / दिग्दर्शक: ओमकार दामले / २० मि. ०२ से.
९. प्रयोग / दिग्दर्शक: पुष्पक जळगावकर / २४ मि. ३१ से.
१०. राजा / दिग्दर्शक: संतोष बांदेकर / १७ मि. १४ से.
११. सप्पर / दिग्दर्शक: अमोल साळवे / १६ मि. १२ से.
१२. साईड मिरर / दिग्दर्शक: विराज झुंजारराव / २६ मि. ५० से.
१३. ताजमहाल / दिग्दर्शक: प्रविण खाडे / १० मि. ५४ से.
१४. द कॉईन / दिग्दर्शक: रुपेश वेदे / ११ मि. ३६ से.
१५. विकट / दिग्दर्शक: देवदत्त मांजरेकर / ०६ मि. ३० से.

या १५ लघुपटांमधून प्रथम निवडल्या जाणाऱ्या एकास सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळणार असून रु. ७५,०००/- रोख रक्कम व ट्रॉफी व प्रमाणपत्र बक्षिस देण्यात येईल. तसेच द्वितीय लघुपटाला रु. ५०,०००/- रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र आणि तृतीय लघुपटास रु. २५,०००/-चे रोख बक्षिस, ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. 
 

Web Title: matches in 15 short films at Prabodhan International Short Film Festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.