'मीटू' सारखा संवेदनशील विषय 'घर होतं मेणाचं'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 08:40 PM2018-11-30T20:40:00+5:302018-11-30T20:40:00+5:30

'घर होतं मेणाचं' चित्रपट ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Me Too Campaign cover in Ghar Hote Menache Movie | 'मीटू' सारखा संवेदनशील विषय 'घर होतं मेणाचं'मध्ये

'मीटू' सारखा संवेदनशील विषय 'घर होतं मेणाचं'मध्ये

googlenewsNext


स्त्रीच्या दुबळेपणाचा फायदा घेणे, स्वप्न दाखवून बळजबरी विनयभंग करणे, तिला दुय्यम स्थान देणे या गोष्टी काही आजच्या नाहीत. अगदी पुरातन काळापासून स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेलेले आहे. समाज रचनेप्रमाणे तिला वागवले आहे. आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पुरुषाइतकेच स्त्रीसुद्धा आपले कर्तृत्त्व सिद्ध करू लागली आहे. दबलेला हुंकार आता बोलता झाला आहे. पूर्वी कधी काळी ज्या पुरुषाने आपले पुरुषत्व गाजवून, एकतर्फी अधिकाराने स्वत:ची शारीरिक भूक भागवली त्यांच्या विरोधात स्त्रिया विशेष करुन समजदार स्त्रिया आता बोलत्या झालेल्या आहेत. मी टू हे सध्या गाजत असलेले प्रकरण त्याचेच उदाहरण सांगता येईल, असे मत 'घर होतं मेणाचं' चित्रपटाच्या टीमने लोकमतशी बोलताना व्यक्त केले.  
ज्ञानेश्वर ढोके आणि नितीन ज्ञानदेव शेटे यांनी या चित्रपटाची निर्मिती करुन या नव्या विषयाला चालना दिलेली आहे. चित्रपटाची नायिका वसुंधरा असून ती विवाहित आहे. पती सतत नाट्य प्रयोगात व्यस्त असल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर येऊन पडलेली आहे. कुटुंबाच्या सुखासाठी धडपड करत असताना तिचे स्वत:चे वैयक्तिक जीवन उदध्वस्त झालेले आहे. कौटुंबीक गरजा भागवण्यासाठी ती घराबाहेर पडते. जिच्याबरोबर ओळख होते त्यात वसुंधरासुद्धा भरकटली जाते. पुरुषांच्या मनमानी व्यवहाराला वेळीच उत्तर द्यायला हवे. तिचे व्यक्त होणे म्हणजेच मी टू ‘मी सुद्धा’ असे तिचे सांगणे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. 

यावेळी चव्हाण म्हणाले, आजवरच्या शोषित, कौटुंबिक नात्यापेक्षा ही थोडी वेगळी भूमिका आहे ज्यात अलकाचे वेगळे रुप पहायला मिळणार आहे. ग्राफिक तंत्राचा चित्रपटांच्या नामावलीत आजवर बऱ्याचवेळा वापर केलेला आहे. इथे मात्र चित्रपटातली नायिका आवश्यक तिथे ग्राफिकच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त करणार आहे. चित्रकथा या संकल्पनेतून हा चित्रपट हाताळला गेलेला आहे. ग्राफिक आणि अ‍ॅनिमेशनची कामगिरी योगेश गोलटकर याने केलेली आहे. अविनाश नारकर, पल्लवी सुभाष, आशालता वाबगावकर, रविंद्र बेर्डे, शितल शुक्ल, सिद्धार्थ जाधव यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
यापूर्वी राजेश यांनी असेच संवेदनशील विषय हाताळून आपल्या सर्जनशील दिग्दर्शनाची जाणीव करुन दिलेली आहे. श्री सिद्धी गणेश फिल्मची ही प्रस्तूती असून ७ डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Web Title: Me Too Campaign cover in Ghar Hote Menache Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.