मीरा बनली हेमा, 'इलू इलू' चित्रपटात दिसणार हटके अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 16:30 IST2025-01-04T16:30:04+5:302025-01-04T16:30:56+5:30

Meera Jagannath: बिग बॉस मराठी गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे.

Meera turns into Hema, will be seen in a unique style in the film 'Ilu Ilu' | मीरा बनली हेमा, 'इलू इलू' चित्रपटात दिसणार हटके अंदाजात

मीरा बनली हेमा, 'इलू इलू' चित्रपटात दिसणार हटके अंदाजात

आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी बिग बॉस मराठी गाजवणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ (Meera Jagannath) आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे. हेमाचा बोल्ड अँड  ब्युटीफुल अंदाज  आपल्याला आगामी 'इलू इलू' (Ilu Ilu Marathi Movie) या मराठी  चित्रपटात दिसणार आहे. मीराचं दिलखेचक पोस्टर सध्या सोशल  मीडियावर चर्चेत आहे. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित 'इलू इलू' ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.     

आजवरच्या माझ्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला 'इलू इलू'च्या निमित्ताने करायला मिळाली  याचा आनंद असून हेमा देसाई ही व्यक्तिरेखा मी स्वतः खूप एन्जॉय केली. पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. हेमा देसाई या भूमिकेच्या निमित्ताने मला ती संधी मिळाल्याचे मीरा सांगते.  


एली अवराम दिसणार मुख्य भूमिकेत
२०१३ मध्ये 'मिकी व्हायरस' या चित्रपटाद्वारे हिंदीत दाखल झालेल्या एली अवरामने आजवर 'किस किस को प्यार करूं', 'नाम शबाना', 'पोस्टर बॅाईज', 'बाझार', 'मलंग', 'कोई जाने ना', 'गुडबाय' या हिंदी चित्रपटांसोबतच तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 'इलू इलू' या मराठी चित्रपटात एली मिस पिंटो या मुख्य भूमिकेत झळकणार आहे. पण ही व्यक्तिरेखा यशस्वीपणे साकारण्यासाठी एलीनं खूप मेहनत घेतली आहे. 

'इलू इलू' चित्रपटाबद्दल
'इलू इलू' चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत.  छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे  यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत.

Web Title: Meera turns into Hema, will be seen in a unique style in the film 'Ilu Ilu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.