"पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी आणि मिताली वेगळ्या व्यक्तींना डेट करत होतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 13:55 IST2024-01-18T13:54:45+5:302024-01-18T13:55:43+5:30
Siddharth Chandekar And MItali Mayekar : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान सिद्धार्थ चांदेकर याने एका मुलाखतीत त्या दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते प्रेमात कसे पडले याचा खुलासा केला.

"पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी आणि मिताली वेगळ्या व्यक्तींना डेट करत होतो, पण...", सिद्धार्थ चांदेकरचा खुलासा
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. ते दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान सिद्धार्थ चांदेकर याने एका मुलाखतीत त्या दोघांच्या पहिल्या भेटीपासून ते प्रेमात कसे पडले याचा खुलासा केला.
सिद्धार्थ चांदेकर याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि मितालीच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितले. ते दोघे जेव्हा पहिल्यांदा भेटले तेव्हा ते वेगळ्या व्यक्तींना डेट करत होते. ते टाइमपाससाठी भेटले होते. मात्र नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली. याबद्दल तो म्हणाला की, आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही अजिबातच एकमेकांना डेट करण्यासाठी भेटलो नाही. अक्षरश: आम्ही टाइमपाससाठी भेटलो होतो. म्हटलं भेटून बघू. आम्ही हॅरी पॉटर एकत्र पाहायचे ठरले. मी उगाच तिला सांगितलं होतं की माझ्याकडे हार्ड डिस्क आहे आणि त्यात खूप हॅरी पॉटरचे चित्रपट आहेत. तसे काही नव्हते. नंतर जेव्हा आम्ही वारंवार भेटत गेलो. त्यानंतर मी इतर मुलींना भेटणं थांबवलं आणि सतत तिच्यासोबत टाइम स्पेंड करु लागलो. तेव्हा मला आयुष्यात हिच मुलगी हवी असल्याची जाणीव झाली. तसंच तिलाही वाटलं.
तो पुढे म्हणाला की, बॅकस्टोरी अशी आहे, आम्ही पहिल्यांदा जेव्हा भेटलो तेव्हा आम्ही दोघेही वेगळ्या रिलेशनशीपमध्ये होतो. तेव्हा आमचं जे बोलणं होते ते लंडन आणि इतर गोष्टींवर असायचो. तेव्हा आम्ही दोघे हॅरी पॉटर फॅन असल्याचे समजले. त्या भेटीनंतर जेव्हा आम्ही परत भेटलो तेव्हा आम्हाला जाणवलं की पहिल्या भेटीतही आम्ही एकमेकांना आवडू लागलो होतो. आता आम्ही लग्न केलं.
वर्कफ्रंट..
सिद्धार्थ चांदेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतेच त्याचे झिम्मा २ आणि ओले आले हे चित्रपट रिलीज झाले. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. त्यानंतर लवकरच तो श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटात झळकणार आहे. यात त्याच्यासोबत सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहे.